नेवासा तालुक्यात कॅबिनेट मंत्री श्री भरत शेठ गोगावले यांची भेट, लवकरच विकासासाठी निधी जाहीर
नेवासा (३० डिसेंबर २०२४) – महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय श्री भरत शेठ गोगावले यांनी आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री विठ्ठल रावजी लंघे यांच्या नेतृत्वाखाली नेवासा तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर व श्री क्षेत्र देवगड संस्थान येथे भेट दिली.
या दौऱ्यात, मंत्री श्री गोगावले यांनी नेवासा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी लवकरच आवश्यक निधीची घोषणा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी श्री शेत्र शनिश्वर देवस्थान येथे आमदार विठ्ठल रावजी लंघे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष व नेवासा विधानसभा संयोजक श्री सचिन भाऊ देसरडा, भाजप युवा नेते श्री ऋषिकेश भाऊ शेटे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री बाळासाहेब पवार, तालुकाध्यक्ष श्री संजय पवार, विधानसभा प्रमुख श्री भाऊसाहेब वाघ, श्री प्रमोद घावटे, श्री प्रकाश गायके, श्री प्रताप कोंगे, श्री संजय वाघमारे आणि अन्य महायुती कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमात मंत्री श्री गोगावले यांचा कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या वतीने उत्साहात सन्मान करण्यात आला. मंत्री श्री गोगावले यांनी नेवासा तालुक्याच्या ऐतिहासिक महत्त्वाची दखल घेतली असून, लवकरच या भागातील विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमात मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते, ज्यांनी मंत्र्यांच्या घोषणेचे स्वागत केले.