श्री. नितीन दिनकर यांची 'अहिल्यादेवी नगर उत्तर जिल्हा कार्याध्यक्ष' पदी नियुक्ती
नेवासा ( प्रतिनिधी) दिनांक 21 डिसेंबर 2024, मुंबई – भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्र विधान परिषद सदस्य श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी 'अहिल्यादेवी नगर उत्तर जिल्हा कार्याध्यक्ष' पदावर श्री. नितीन दिनकर यांची नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती तात्काळ प्रभावी करण्यात आली आहे.
श्री. नितीन दिनकर यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवून त्यांना या महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती दिली आहे. यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्याला आणखी बळ मिळेल, अशी अपेक्षा आहे. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्री. दिनकर यांना मनःपूर्वक अभिनंदन करत, या नवीन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या निवडणुकीमुळे दिनकर यांचे सर्वत्र कौतुक होऊन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे