विठ्ठलराव लंघे यांनी मंत्रीपदाबाबत दिली महत्त्वाची प्रतिक्रिया
भालगाव प्रतिनिधी (राहुल चिंधे).नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीलाही राज्यभरातून जनतेचा मोठा कौल मिळाला आहे. याच निवडणुकीत नेवासा तालुक्यात शिंदे गटाचे उमेदवार विठ्ठलराव लंघे यांनी ठाकरे गटाचे शंकरराव गडाख आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे बाळासाहेब मुरकुटे यांना पराभूत करून विजय मिळवला.
भालगाव येथील सप्ताह सांगता प्रसंगी विजयी उमेदवार विठ्ठलराव लंघे यांनी उपस्थितांना संबोधित केले. या प्रसंगी, गेल्या तीन दिवसांपासून माध्यमांमध्ये मंत्रीपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर लंघे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, “जनतेने मला विश्वास दिला आहे आणि मी त्यांचा कौल लक्षात ठेवून कार्य करणार आहे. मंत्रीपदाबाबत चर्चांमध्ये मी भाग घेत नाही. माझा मुख्य उद्दिष्ट लोकसेवा आहे, आणि मी त्यासाठीच सर्वतोपरी प्रयत्न करेन."
विठ्ठलराव लंघे यांच्या या प्रतिक्रियेनंतर त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. प्रतिनिधी राहुल चिंधे महाराष्ट्र न्यूज प्रिन्स आपले काय मत आहे याविषयी नक्कीच कमेंट द्वारे कळवा आणि आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या चॅनलला सबस्क्राईब करा