*प्रहारच्या सेवेच्या अजेंडाला जाती-धर्माच्या अजेंड्याने छेद* - प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली सेवेच्या अजेंडाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाती-धर्माच्या पलीकडे सेवेच्या अजेंड्याने झंजावत सुरू केला सेवेचा यज्ञ सर्वसामान्य माणसाच्या दुःख आणि वेदनेशी संबंधित असल्याने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या उद्देशाने संविधान निर्मिती केली संविधानामध्ये भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे धर्मनिरपेक्षता हीच ताकद आहे ये निक्षून सांगितले या अजेंडाला बच्चु भाऊंनी कधीही छेद जाऊन दिला नाही या माध्यमातून अनाथ दिव्यांग शेतकरी यांना न्याय देण्याचे काम केले परंतु देशांमध्ये महाशक्तीच्या रूपाने उदय झालेल्या भाजपने जाती धर्माचे विष पेरण्याचं काम करून त्याला छेद दिला या बाबीला देशाला वाचविण्यासाठी चालू सत्तेला लाथ मारून बच्चु भाऊंनी समाजाला नवीन पर्याय देण्यासाठी परिवर्तन महाशक्तीचा प्रयोग निवडणुकीच्या माध्यमातून केला देश हितापेक्षा सत्ता ही ताला प्राधान्य देणाऱ्या भाजपाने जी धर्मसत्ता राज्य सत्तेवर असणाऱ्या लोकांना योग्य मार्ग दाखविण्याचे काम करते तीच धर्मसत्ता राज्य सत्तेमध्ये घालून सत्तेवर जाण्यासाठी मागे पुढे पाहिले नाही महाराष्ट्रामध्ये प्रचंड जातीवाद आणि धर्मवाद पेटलेला असताना योग्य भूमिका घेण्याचे काम बच्चू भाऊंनी केले निवडणुकीमध्ये पराभव होणे मधल्या काळात प्रहारला सत्ता मिळणे यामुळे अनेक जण सत्तेला फायदा घेणारे जमा झाले विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सत्तेची अत्यंत आवश्यकता असते यामध्ये देखील दुमत नाही परंतु महाराष्ट्र आज संक्रमण काळातून जात आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्या महामानवांनी दिलेले आहे त्यांचे विचार गुंडाळून सत्तेचे स्वप्न साकार करण्यासाठी वाटेल ते करणारे लोकसेवक निर्माण झालेले आहेत आशा काळामध्ये प्रहारचा जो मूळ अजेंडा आहे तो म्हणजे सेवेचा आणि अन्याय तेथे प्रहार करण्याचा त्यापासून दूर जाऊन सत्तेमध्ये जायचे असेल तर तडजोडी कराव्या लागतील ते आता जोडीने प्रहार जनशक्ती पक्षाला सत्तेची उब निश्चित मिळेल परंतु प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते हे कोणी वाळू तस्करी अथवा दोन नंबर धंदे करणारे नाहीत सर्वसामान्य ताकतीवर उभा असलेलं प्रहार सरकार हे सत्ताधारी सरकार पेक्षा कधीही मोठेच आहे सेवेच्या अजेंडा मध्ये दुर्दैवानं भाऊंना देखील पराभवाला सामोरे जावं लागलं परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा भिडू सत्यता असावा हीच धारणा असताना गैरमार्गाचा अवलंब करून सत्तेच्या बाहेर बसावं लागलं आज जर सत्तेमध्ये जाणाऱ्या च्या बाबतीमध्ये तडजोड करावी लागेल ती तडजोड म्हणजे बच्चु भाऊ यांचे मित्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून कदाचित ती गोष्ट शक्य असेल परंतु भाजप हा अजगर असून छोट्या छोट्या पक्षाला गिळंकृत करून दाबून टाकण्याचे काम कायम करत आलेला आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी झगडणार शेतकरी संघटनेचे उदाहरण यासाठी पुरेशी बोलके आहे त्याचबरोबर महादेव जानकर साहेब असतील किंवा अन्य कोणीही नेते सत्तेमध्ये जात राहतील परंतु या तडजो वडीमुळे समाजांच्या विचाराचे प्रचंड मोठ नुकसान होतं याचे उदाहरण आहे. शिंदे साहेबांना फक्त सत्ता हस्तगत करण्यासाठी मुख्यमंत्रीपद देणारे भाजप नवीन सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद देणार नाहीत त्यामुळे शिवसेनेची अवस्था देखील तोंड दाबून बुक्क्याचा मार हीच असेल त्यामुळे यापेक्षा काही वेगळा मार्ग नाही अनेक जणांनी सत्तेमध्ये जायचे का? ही प्रश्नावली निर्माण केलेली आहे तर सतत विवेक बुद्धीला जर विचारले तर महाराष्ट्राच्या विचारधारेवर जर सरकार आणायचे असेल तर संघर्षाशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही प्रचंड धर्मवादी सत्तेसाठी हाताशी धरून सृष्टी आहे एक प्रकारे फुटत पाडत आहे यामध्ये आपल्याला सामील व्हायचे नसेल तर सत्ते जवळ जाणे योग्य ठरणार नाही हे माझे स्पष्ट मत आहे प्रहार जनशक्ती पक्षाची संघटनात्मक बांधणी संपूर्ण महाराष्ट्रात बच्चू भाऊंच्या नेतृत्वाखाली सक्षम होऊन विचारांची लढाई लढता येईल नाहीतर प्रहार जनशक्ती पक्षाची स्वतंत्र अशी मतदारांमध्ये असलेली भावना कुठेतरी छेद जाईल असे मला वाटते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये धर्म सत्तेचा प्रभाव निर्माण झाल्याने हिंदू सारा एक ही घोषणा करणारी हिंदू दोन ठिकाणी करून भाजपाचा असलेला हिंदू हिंदू असून देखील केवळ दुसऱ्या पक्षाचे वैचारिक काम करत आहे यामुळे हिंदू राहत नाही ही देखील मोठी दुपारी निर्माण झालेली आहे. अठरापगड जातीच्या महाराष्ट्रामध्ये जातियंताची लढाई जातीवर आणून ठेवण्याचे काम या निवडणुकीने केलेल्या आहे बच्चू भाऊंना देखील ही गोष्ट मान्य आहे राजकारणामध्ये तडजोडी करावे लागतात परंतु आजची सत्तेची तडजोड ही प्रहार जनशक्ती पक्षाला फक्त सत्यपूर्ती खूप महाग पडू शकते. याबद्दल बच्चू भाऊंच्या मतदार संघामध्ये भाऊंनी प्रचंड मोठे काम उभारलेले आहे ही गोष्ट सत्तेमुळे शक्य झाली परंतु खेळ खेळून बच्चुभाऊंचा पराभव घडवून आणणाऱ्या सत्ताधाऱ्यामुळे छेद गेलेला असल्याने दोन तारखेला सत्ताही न परवडणारी असणार आहे भलेही विरोधात राहून वैचारिक मशागत करण्याची वेळ आली तरी चालेल भाऊंनी सर्वसामान्यांसाठी जो संघर्ष उभा केला आहे त्या संघर्षाला निश्चितच महाराष्ट्र मध्ये तोड नाही परंतु आजच्या काळामध्ये सर्वसामान्य माणूस भेदरलेला असल्याने उद्या सत्ता नको संघर्ष करावा हे माझे स्पष्ट मत आहे शेवटी प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा बच्चुभाऊ कडू असल्याने त्यांच्यासोबत कायम विचाराने राहू कुटुंबप्रमुख म्हणून इतर सदस्यांचे भाऊ मत घेत असल्याने माझे जे मत आहे ते मी मांडले अंतिम निर्णय बच्चू भाऊंचा असल्याने ते योग्य निर्णय घेऊन प्रहारला पुढील दिशा देतील हीच अपेक्षा -ऍड. पांडुरंग केशव औताडे 9890273756