प्रतिनिधी गणेश चौगुले
*राष्टवादी चे नेते अब्दुल भैय्या शेख यांचा जिल्हा अधिकारी कार्यलयवार विविध प्रश्नांवर धडक मोर्चा*
*फायनान्स कंपनी यांच्या फसवेगिरी ला कंटाळून कर्जदार यांची जिल्हा अधिकारी यांना निवेदन*
*अहिल्यानगर : नगर जिल्ह्यातील शेकडो पीडित कर्जदार यांचे अब्दुल भैय्या शेख यांना साकडे तर जिल्हा अधिकारी यांना फायनान्स कंपनी तक्रार निवेदन.*
दि. 10 ऑक्टोबर रोजी नगर जिल्ह्यातील शेकडो पीडित कर्जदार यांच्यावर जो अन्याय होतो त्यांचे प्रश्न घेऊन जिल्हा अधिकारी कार्यल्यावर नेवासा राष्ट्रवादी पक्ष आणि नेवासा तालुक्यातील नेते अब्दुल भैय्या शेख यांनी कर्जदार पीडित शेतकरी, गरीब छोटे मोठे व्यावसायिक यांची फायनान्स कंपनी लूट करीत आहे. दहा लाखाचे कर्ज दिले दहा वर्ष फेड दहा हजार रुपये महिन्याला हफ्ता पंधरा,वीस, तीस, चाळीस वर्ष झाले तरी कर्जदार यांच्यावर मुद्दल कर्ज तसेच दाखवले जाते. एखाद्या कर्ज दाराने दहा वर्ष दहा लाख रुपये कर्ज नियमित थोडे मागे पुढे करुन हफ्ते भरले तरी शिल्लक कर्ज दहा लाख जसेच्या तसें वीस वर्ष भरणा केला तरी कर्ज तसेच या बाबद जिल्हा अधिकारी साहेब यांनी तातडीने फायनान्स कंपनी यांची बैठक घेऊन विचारणा करावी. नगर जिल्ह्यातील शेकडो कर्जदार यांनी या जाचाला कंटाळून आत्महत्त्या केल्या. लोकांचे प्रपंच उजाड होत आहे.
*पीडित लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कुकाणा येथून नगर कडे जात असताना भैय्या यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांची गाडी ना दुरुस्त झाली. हाताला पायाला जखम झाली तातडीने उपचार घेऊन हा तरुण लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगर कडे रवाना झाला. हजारो बहिणीचा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे झालेला अपघातात गाडीचे नुकसान झाले पण सुदैवाने त्यांच्या सोबत असणाऱ्या कुणालाही इजा झाली नाहीं.*
*कुपण ऑनलाईन होत नाही गोर गरिबांना रेषण भेटत नाही तहसिलदार भेटत नाही त्यामुळे तालुक्यातील नागरीकांची एजंट लोक पिळवणुक करीत आहे संजय गांधी निराधार चे पैसे लाभार्थी ना वेळेवर भेटत नाही याची चौकशी होणे बाबद जिल्हा अधिकारी यांच्या कानावर घातले.*
*शेतकरी यांच्या कापुस पिकाला साडे सात हजार रुपये भाव मिळावा शासनाने ठरवून दिलेल्या हमीभाव तसंच सोयाबीन करिता पाच हजार पाचशे रुपये भाव मिळावा म्हणून शासकीय खरेदी केंद्र चालू करावे अशी जिल्हा अधिकारी यांच्या सोबत चर्चा केली. राष्ट्रवादी चे नेते अजित दादा पवार यांना संपर्क साधून पीडित लोकांना आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून लक्ष घालावे अशी विनंती केली.*
*जिल्हा अधिकारी यांनी फायनान्स कंपनी अधिकारी आणि पीडित कर्जदार यांची लवकर बैठक घेऊन मार्ग काढू असे आश्वासन मोर्चातील नागरिक आणि अब्दुल भैय्या शेख यांना दिले.*