प्रतिनिधी नरेंद्र पाटील काळे
नेवासा (निधन वार्ता) नेवासा तालुक्यातील उस्थळ नवे चांदगाव येथील प्रगतशील शेतकरी व तसेच धरणग्रस्तांना न्याय देणारी श्री दादासाहेब उंदरे पाटील यांचे नुकतेच निधन झाले . त्यांनी पुनर्वशीत कुटुंबांना उस्थळ येथे नवीन गावठाण वरती सर्वांना एकत्र घेऊन एकच कुटुंब समजून सर्वांना आश्रय दिला. तसेही मुळगाव शेवगाव तालुक्यातील
घेवरी चांदगाव पण विस्थापित झाल्यामुळे त्यांनी उस्थळ येथे माननीय जेष्ठ मार्गदर्शक स्वर्गीय बाना भाऊ सुकाळकर माजी संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वर्गीय दादासाहेब उंदरे व तुळशीराम सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या गावात नवीन गावठाण वरती त्याच नावाने नवीन चांदगाव मग त्या ठिकाणी सोसायटी असेल ग्रामपंचायत असेल पाच सहा भावंडांनी
कारभार एकीने कारभार केला . त्याच्याकडे गावचे आधारस्तंभ म्हणून पाहिले जात होते नव्हे त्यांनी अनेकांना मदत केली . एक दुर्दृष्टी असलेली सहकारी हरपल्याची खंत गावात व ग्रामस्थ व्यक्त करताना दिसले. तसेच त्यांची मुले व नातवंडे यांनी पुढच्या वारसा चालवला आहे . त्यांचा अंत्यविधी चांदगाव येथील स्मशानभूमी मध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी संभाजीनगरचे राष्ट्रवादीचे नेते हरिभाऊ लगाने तसेच उस्थळ गावची भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे रामराव पाटील भदगले अनेक मान्यवरांनी त्यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली ते अल्पशा आजाराने निधन झाले मृत्यु दिनांक१२/१०/२०२४........ व तसेच दहावा ठिकाण कायगाव टोका येथे त्यांचे दहावा होणार आहे या ठिकाणी होणार दिनांक. २१ /.१० /२०२४ आहे .
👆आपला दुःखकित 👆
उंदरे पाटील परिवार नवीन चांदगाव उस्थळ दुमाला नेवासा ,अहमदनगर.