नेवासा तालुक्यातील संभाजी मुरकुटे यांना सहायक पोलीस आयुक्तपदी पदोन्नती

संभाजी मुरकुटे यांना सहायक पोलीस आयुक्तपदी पदोन्नती
नेवासा (तालुका प्रतिनिधी) -  श्री. मुरकुटे हे मूळचे नेवासा
तालुक्यातील देवगाव येथील रहिवासी असून ते १९९५ रोजी पोलीस सेवेत उपनिरीक्षक म्हणून रूजू झाले होते.सध्या ते मुंबई येथे कार्यरत आहेत.या काळात बच्छानीनगर इमारत दुर्घटना, फरार असलेल्या १०० पेक्षा जास्त आरोपींची अटक, डॉईच बँकेतील अपहार,अत्याचार, खून प्रकरणातील आरोपींची अटक यासह अनेक संवेदनशील व सायबर क्राईम संदर्भातील गुन्ह्यांच्या तपासात मुरकुटे यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांना राष्ट्रपती पदकही मिळालेले आहे. त्यांची बृहन्मुंबई येथे सहायक पोलीस आयुक्त पदावर बढतीने नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे देवगाव सह नेवासा तालुक्यातून अभिनंदन होत आहे.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.