मुकिंदपुर ग्रामपंचायत करणारा आंदोलन याबाबत ग्रामपंचायतने निवेदन दिले आहेत त्या निवेदनात असे म्हटले आहे की मा.उपअभियंता साहेब विद्युत महावितरण कार्यालय नेवासा मुकिंदपूर(नेवासा फाटा) व परिसराच्या विज पुरवठा नेवासा सबटेशनला तात्काळन न जोडल्यास रस्तारोखा आंदोलना बाबत रिपोर्ट : सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत मुकिंदपूर, ता. नेवासा यांचकडून कळविण्यात येते की,मुकिदंपूर गावचा विजपुरवठा अत्यंत विस्कळीत झालेला असून एकही दिवस व रात्र विज पुरवठा सुरळीत होत नाही. वायरमन व संबधीत विभागाचे अधिकारी यांचेशी वेळोवेळी संपर्क साधुन विज पुरवठा सुरळीत करण्याबाबत कळवूनही अनेक महिन्यापासुन विज पुरवठा सुरळीत मिळत नाही. व अधिकारी व वायरमन
उडवा उडवीचे उत्तरे देतात.मुकिदंपूर गांव व परिससराचा विद्युत पुरवठा भानसहिवरा सबस्टेशनला जोडलेला आहे. तरी तो विजपुरवठा नेवासा सबस्टेशन मार्फत तात्काळ जोडण्यात यावा अन्यथा दिनांक 23 /8/ 2024 रोजी सकाळी दहा वाजता नेवासा फाटा येथे गावकऱ्यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन व जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे पुढील महिन्याला सर्व परिणामांची जबाबदारी आपणावर राहील यांची दखल घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे