सीआरपी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मंजूर करा : आ.गडाख


सीआरपी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मंजूर करा : आ.गडाख

नेवासा (तालुका प्रतिनिधी) - समुदाय साधन व्यक्ती (सीआरपी) कर्मचाऱ्यांच्या न्याय्य प्रलंबित मागण्या त्वरित मंजूर करण्याची मागणी आ. शंकरराव गडाख यांनी केली आहे.सीआरपी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात नुकतीच आमदार गडाख यांची भेट घेऊन त्यांच्या पूर्ततेसाठी लक्ष घालण्याची मागणी केली होती. आमदार गडाख यांनी यासंदर्भात शासनाला निवेदन पाठवून समुदाय साधन व्यक्ती (सीआरपी) कर्मचाऱ्यांच्या न्याय्य प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधले आहे. कंत्राटी पद्धतीने सध्या कार्यरत असलेल्या
सीआरपी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची आग्रही मागणी आमदार गडाख यांनी केली आहे. त्याचबरोबर उमेद अभियाना अंतर्गत सीआरपी कर्मचाऱ्यांचे मानधन अल्प असल्यामुळे त्यात भरीव वाढ करण्यासह गावफेरी आयोजनांमार्फत सीआरपी कर्मचाऱ्यांच्या गटातील महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, समुदाय
स्तरावर संस्थांना सक्षम होण्याकामी सीआरपी ताई यांना वेगवेगळे भत्ते मिळावे, कर्मचाऱ्यांच्या प्रमुख प्रलंबित मागण्या मंजूर करण्याची मागणी आमदार गडाख यांनी निवेदनाद्वारे केली आहे. सीआरपी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना संपूर्ण पाठिंबा दर्शवून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.