महालक्ष्मीहिवरेत दोन जणांवर खुनाचा गुन्हा
सोनई: महालक्ष्मीहिवरे (ता.नेवासे) येथे जमिनीचा वाद व मागील भांडणाच्या कारणावरून पाच दिवसांपूर्वी एका व्यक्तीस पेटवून दिल्याची घटना घडली होती. या घटनेतील फिर्यादी गणेश अर्जुन आव्हाड यांचे पुण्याचे ससून
रुग्णालयात निधन झाले. त्यामुळे गावातील दोन जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी (ता. ८) फिर्यादी आव्हाड मोटारसायकलमधून काढलेल्या पेट्रोलची बाटली घेऊन उभे होते.
त्यांना मागील भांडणाच्या रागातून शिवीगाळ व लाथाबुक्क्याने मारहाण करण्यात आली. या भांडणात
हातातल्या बाटलीतील पेट्रोल अंगावर पडल्याचे पाहून पेटलेली काडी अंगावर टाकण्यात आली होती.यातील गंभीर जखमीचे उपचार घेत•असताना शुक्रवारी निधन झाल्यानंतर
मारुती मोहन सानप व शहादेव कारभारी सानप यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहायक पोलिस निरीक्षक आशिष शेळके अधिक तपास करीत आहेत.