खासदार नीलेश लंके यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार सुजय विखे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे,सुजय विखे यांनी नीलेश लंके यांना न्यायालयात आव्हान दिल्याने त्यांच्याच घराण्यातील इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे, देशभर गाजलेला 1991 मधील विखे-गडाख निवडणूक खटल्याला यानिमित्ताने उजळणी मिळाली, आजोबा, बाळासाहेब विखे यांच्यानंतर नातू सुजय विखे यांनी 33 वर्षानंतर पुन्हा एकदा उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली आहे,विखे-गडाख खटल्याची झळ शरद पवार यांना देखील बसली होती,आता सुजय विखे यांनी दाखल केलेल्या निवडणूक याचिकेची झळ कोणाकोणाला बसणार याची चर्चा आहे राज्यात रंगली आहे,ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या विरोधात बाळासाहेब विखे यांची निवडणूक मैदानात 1991 मध्ये थेट लढाई झाली होती,यशवंतराव गडाख ही निवडणूक जिंकले होते,परंतु बाळासाहेब विखे यांनी या निवडीला न्यायालयात आव्हान दिले, न्यायालयात बाळासाहेब विखे यांच्या बाजूने निकाल लागला,व यशवंतराव गडाख यांची निवड रद्द केली,बाळासाहेब विखे यांचे नातू सुजय विखे यांनी 33 वर्षानंतर पुन्हा एकदा आपला पराभव न्यायालयात नेला आहे,प्रतिस्पर्धी उमेदवार नीलेश लंके यांच्या निवडीला आव्हान दिले आहे, त्यामुळे न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे,विखे-गडाख खटला 33 वर्षेपूर्वी देश पातळीवर गाजला होता,तसाच विखे-लंके खटला कोणता राजकीय रंग उधळतो, याची सध्या नगरमध्ये चर्चा आहे.