गैरव्यवहार करणाऱ्या नेवासे येथील दुय्यम निबंधकावर कारवाई व्हावी नेवास वकील संघ.
प्रतिनिधी । नेवास वकिलांना तसेच सामान्य नागरिकांना
देखील अरेरवीची भाषा वापरून शिवीगाळ करणाऱ्या तसेच प्रसंगी मारामारी करणाऱ्या भ्रष्टाचारी सबरजिस्टर अंबादास पवार याला निलंबित करावे, अशी मागणी नेवासे
वकील संघाने केली असून प्रसंगी यासाठी
आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. वकील व सहाय्यक निबंधक यांच्यामध्ये झालेल्या वादामुळे नेवासा वकील संघटनेने याबाबतचे निवेदन नेवासा वकील संघाने वकील संघटनेचे अध्यक्ष कल्याण पिसाळ यांच्या नेतृत्वाखाली नेवासा तहसीलदार यांना दिले आहे यावेळेस एडवोकेट ठुबे, एडवोकेट कर्डक, एडवोकेट कदम ,सह वकील संघटनेचे समस्त सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच याबाबतचे विचारना सहाय्यक निबंधक पवार यांना केली असत दरम्यान, याप्रकरणी दुय्यम निबंधक पवार यांनी हा मला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे.