*ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी जनसंपर्क अधिकारी बी.जी.पाटील यांचे निधन*
भेंडा(वार्ताहर):-- येथील श्री. ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी
जनसंपर्क अधिकारी भिमराव गंगाराम उर्फ बी.जी.पाटील (वय ८३ वर्षे) यांचे मंगळवार दि. ९ एप्रिल रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.
कै.बी.जी.पाटील हे मूळचे मुडी, ता. अमळनेर जि. जळगांव येथील रहिवासी होते. भूविकास बँकेचे अधिकारी म्हणून १९६५ मध्ये ते नेवासा तालुक्यात आले. १९६५ ते १९७२ या कालावधीत ते भूविकास बँकेत कार्यरत होते.त्याच दरम्यान लोकनेते मारुतराव घुले पाटील यांनी १९७० मध्ये श्री.ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. बी.जी.पाटील यांनी कारखाना भागभांडवल (शेअर्स) उभारणीत मोलाची कामगिरी बजावली होती. त्यामुळे मारुतराव घुले पाटलांनी १९७२ मध्ये त्यांची कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी पदावर नियुक्ती केली. कारखाना स्थापने पासून १९७२ ते २००३ पर्यंत जनसंपर्क अधिकारी पदावर ते कार्यरत होते.३१ वर्षाचे प्रदीर्घ सेवे नंतर ते २००३ मध्ये सेवानिवृत्त झाले होते.नगर जिल्ह्यातील वृत्तपत्र क्षेत्रातील संपादक-पत्रकार, सहकार व राजकीय क्षेत्रातील मातब्बर नेत्यांशी त्यांची अतिशय जवळीक होती.
त्यांचे मागे पत्नी,एक बहीण, तीन भाऊ,चार मुले,सुना ,नातवंडे असा परिवार आहे.
हेमंत,अनिल, प्रा.डॉ.अरविंद व रविंद्र पाटील यांचे ते वडील होत.