भेंडा येथे गोवंश जनावरांच्या मांसाची वाहतूक करणारा ट्रक पकडला
भेंडा (वार्ताहर) - नेवासा तालुका गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे भेंडा येथे गोवंश मांस वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात
नेवासा पोलिसांना यश आले.याबाबत अधिक माहिती अशी,
मंगळवार २ एप्रिल रोजी सांयकाळी ५ वाजेच्या सुमारास नेवासा तालुका बजरंग दल, देवा ग्रुप फाउंडेशनच्या गोरक्षकांना
श्रीरामपूरहून बीडकडे जाणारा एक ट्रक गोवंशमांस घेऊन भेंड्याकडे येत असल्याची खबर मिळाली. गोरक्षकांनी तत्परता दाखवत भेंडा येथे कारखाना ऊस ट्रॅक्टर गटाजवळ त्या
आयशर कंपनीच्या ट्रकला अडवून तपासणी केली असता ट्रक (एमएच ०४ ईबी ९९४९)मध्ये गोवंश जातीच्या जनावरांचेअंदाजे ५टन मांस आढळून आले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ट्रक, ट्रकमधील गोवंश
जातीच्या जनावरांचे मांस व चालकाला ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.