देडगावच्या मंदिरांतील चोरी प्रकरणातील आरोपी मुद्देमालासह जेरबंद स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाची कारवाई; शेवगाव तालुक्यातील घरफोडीचीही कबुली
नेवासा (प्रतिनिधी)-तालुक्यातील देडगाव येथीलमंदिरातील चोरीच्या गुन्ह्यातील एका आरोपीला ३ लाख १७हजार ५०० रुपये किंमतीचे मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्याने शेवगाव तालुक्यात केलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचीही कबुली दिली. त्याचे चौघे साथीदार पसार आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, २१ मार्च रोजी फिर्यादी चंद्रकांत भानुदास मुंगसे देडगाव ता. नेवासा यांचे
गावातील विविध मंदीरातील दानपेट्या फोडून २१ हजार
रुपये रोख रक्कम अनोळखी इसमांनी चोरुन नेले बाबत नेवासा पोलीस ठाण्यात गु.र.नं.२८० भादंवि कलम ३७९, ३४ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल आहे मंदीर चोरीची घटना
घडल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हा उघडकिस आणणेआदेशित केले होते.सदर त्यानुसार श्री. आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेबाल
व अंमलदार रविंद्र कर्डीले,अतुल लोटके, संदीप दरंदले,
फुरकान शेख, बिजय ठोंबरे,प्रमोद जाधव, रविंद्र घुगांसे व
चंद्रकांत कुसळकर अशांचे पथक नेमून गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकीस आणणे
बाबत आवश्यक सूचना देवून पथकास रवाना केले. पथकाने
घटना ठिकाण व आजुबाजूचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून
त्या आधारे आरोपींचे वर्णन व गुन्हा करण्याची पध्दतीचा
अभ्यास करुन, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेताना
पथकास वर नमुद गुन्हा संशयीत इसम नामदेव आव्हाड रा.
घनसांवगी (जि. जालना) याने त्याचे साथीदारासह केल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने संशयिताचा शोध घेता तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले.त्याने त्याचे नाव नामदेव लक्ष्मण आव्हाड (वय २५) रा.घुन्शी, ता. घनसांवगी (जिल्हा जालना) असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे वर नमुद
गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता त्याने त्याचे साथीदार
नामे सतिष माणिक काळे फरार), हिरा माणिक काळे
दोन्ही रा. घनसांवगी, जिल्हा विजय जालना (फरार),
अशोक चव्हाण रा. बालाजी देडगाव ता. नेवासा (फरार)व रामा (विजय चव्हाण याचा नातेवाईक) (फरार) पुर्ण नाव माहित नाही. यांचे सोबत मिळून ताब्यातील स्विफ्ट गाडीत येवून गुन्हा केल्याचे सांगितले.आरोपीस अधिक विश्वासात
घेवुन अहमदनगर जिल्ह्यात आणखीन कोठे कोठे गुन्हे
केले याबाबत विचारपुस करता आरोपीने सर्वांनी मिळुन काही
दिवसांपूर्वी शेवगाव ते बोधेगांव जाणारे रोडवरील बंद घर फोडून घरातील रोख रक्कम चोरी केल्याचे सांगितल्याने जिल्हा
गुन्हे अभिलेख पडताळणी करता शेवगांव पो.स्टे.गु.र.नं.
२१९ / २०२४ भादविक ४५४,३८० प्रमाणे दाखल गुन्हा
उघडकिस आला आहे.आरोपीची अंगझडती घेता
त्याचे अंगझडतील मिळुन आलेल्या रोख रकमेबाबत
विचारपुस करता आरोपीने मंदीर चोरीचे गुन्ह्यातील २ हजार
५०० रुपये रोख व घरफोडीच्या गुन्ह्यातील १५ हजार रुपये रोख रक्कम असल्याचे सांगितल्याने
आरोपीस दोन्ही गुन्ह्यातील १७ हजार ५०० रुपये रोख व गुन्हा
करताना वापरलेली ३ लाख
रुपये किंमतीची स्विफ्ट कार असा
एकुण ३ लाख १७ हजार ५०० रुपये किंमतीच्या मुद्देमालासह
गु.र.नं. २८० / २०२४ भादविक
ताब्यात घेवून नेवासा पो.स्टे. ३७९, ३४ प्रमाणे दाखल
गुन्ह्याचे तपासात हजर केले.पुढील तपास नेवासा पोलीस
स्टेशन करीत आहे.