अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघाच्या अहमदनगर- उत्तरं जिल्हाध्यक्ष पदी अनिल पा. ताके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे अखिल भारतीय कुणबी महासंघाचे महाराष्ट्रप्रदेशअध्यक्ष प्रल्हाद गूळभिले पाटील यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत श्री ताके यांची महासंघाचे उत्तर नगर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, यावेळी संघटनेचे प्रदेश संस्थपक सचिव जि. के. गडेकर,प्रदेश कार्यध्यक्ष सतिष पवार,मराठवाडा विभाग अध्यक्ष डॉ. रंगनाथ पवार आदी उपस्थित होते.
अनिल ताके पा. यांनी आजपर्यंत समाजासाठी निस्वार्थी पणे केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची ही नियुक्ती करीत असल्याचे प्रदेशाध्यक्ष गुलाभिले पाटील यांनी सांगितले.अखिल भारतीय कुंणबी मराठा महासंघाचे माध्यमातून समाजातील विविध लोककल्याणकारी प्रश्न लोकशाही मार्गाने सोडविण्यासाठी आपण संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करणार असुन समाजातील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असेही श्री. ताके म्हणाले.
अनिल पा. ताके यांची अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झालेबद्दल श्री.ताके यांचे संघटनेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष प्रल्हाद गुलाभिले पाटील,प्रदेश सचिव जि. के गाडेकर,मराठवाडा विभागाचे आद्यक्ष डॉ.रंगनाथ काळे पा.संस्थपक कार्यध्यक्ष सतीश पवार,पश्चिम महाराष्ट्र प्रमुख दिलीप पोटे,प. महाराष्ट्र समन्यवक सौ. मनीषा पठारे, उत्तर नगर जिल्हा महिला आघाडी लोकसभा क्षेत्र प्रमुख सौ. नीता हासे पाटील,जिल्हा कार्याध्यक्ष सौ. उज्वला शिंदे, श्रीरामपुर तालुकाध्यक्ष दत्तात्रय जाधव पाटील यांनी अभिनंदन केले आहे.