नेवासा : नेवासा तालुक्यातील
सोनई येथील बेल्हेकरवाडी रोडवरील विनियाड चर्च मध्ये दिनांक१५ फेब्रुवारी २०2४ रोजी दोन
अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ नेवासा शहरात सायंकाळी तालुक्यातील
सकल हिंदू समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.यावेळी सोनई येथे झालेल्या घटनेचा
निषेध करण्यात आला. सोनई घटनेतील नराधमांना फाशी मिळेपर्यंत स्वस्थ बसू नका, असे आवाहन हिंदुत्ववादी नेते महेश लांडगे यांनी सांयकाळी झालेल्या जाहीर सभेत केले.यावेळी निघालेल्या मोर्चामध्ये सोनईतील नराधम आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी, हिंदु समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना धर्मांतरित करत असलेल्या समाजातील वाईट प्रवृत्तीचा शोध घेवून त्यांची चौकशी करण्यात यावी व त्यासाठी धर्मांतरण कायदा व्हावा,लव जिहाद सारखे विषयांवर कायदा पारित व्हावा,गोवंश हत्या थांबवण्यात याव्या अशी मागणी जनआक्रोश मोर्चा काढून करण्यात आली.
मळगंगा देवी मंदिराच्या प्रांगणातून काढण्यात आला
सदरच्या हिंदू जनआक्रोश मोर्चाला नेवासा येथील
हा मोर्चा श्री खोलेश्वर गणपती मंदिरापर्यंत काढण्यात
आला. त्या नंतर या मोर्चाचे रूपांतर नगरपंचायत चौकात
आयोजित जाहीर सभेमध्ये झाले. यावेळी छत्रपती
शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी
महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी असा
जयघोष यावेळी करण्यात आला. यावेळी झालेल्या
यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. अँड. मयूर वाखुरे
यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले.
यावेळी बोलताना महेश दादा लांडगे म्हणाले
की हिंदू संघटित झाला तर अन्यायच होणार
नाही, माऊलींच्या या मायभूमीत दोन मुलींवर अन्याय
होत असेल तर आणि त्यासाठी न्याय मागत असेल
तर आम्ही जातीयसलोखा बिघडवतो का? असा
सवाल त्यांनी यावेळी बोलताना केला.
यावेळी बोलताना साध्वी दुर्गा ताई म्हणाल्या,
धर्मांतराविषयी मोठे षडयंत्र चालू आहे, यासाठी
माता भगिनींनी देखील जागृत होण्याची गरज आहे.
घरातील मुलींना चांगली शिकवण द्या, आता नारीवर
होणारा अन्याय कदापिही सहन करणार नाही, अन्याय
अत्याचार करणाऱ्या प्रवृत्तीला चोप द्या, त्यासाठी हिंदू
समाजाने संघटीत होऊन एकत्रित या असे आवाहन
करून त्यांनी त्यासाठी छत्रपती शिवरायांचा कायदा
लागू होण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.