महापारेषणच्या ठेकेदाराकडुन पोलिस हाताशी धरुन पञकार व शेतकर्यावर खोटे गुन्हे दाखल रद्द करण्यासाठी वचिंत बहुजन आघाडी चे धरणे आंदोलन
प्रतिनिधी रमेश राजगिरे
नेवासा प्रतिनिधी। विश्व विंड ते भेंडा 220 के व्ही महापारेषण चे अति उच्च दाब वीज वाहिनी मनोरे व तारा ओढणे कामी शेतकऱ्यांच्या भविष्यात होणाऱ्या नुकसानीचा व अती धोकादायक वीज प्रकल्पा मुळे विजेच्या सुरक्षे विषयी कुठलाही विचार न करता बेकायदेशीरपणे महापारेषण चे ठेकेदार यांनी उप आधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्याकडून संगनमताने आदेश मिळवला होता अति धनाड्य महापारेषण ठेकेदार व शासकीय कमिटी यांनी अतिशय तटपुंजा मोबदला देताना पोलीस बाळाचा वापर करून रांजणगाव येथे पञकार व शेतकर्यांवर सोमवार दि.१२/०२/२०२४रोजी मध्यरात्री खोटे गुन्हे दाखल करून अटक करण्याच्या धमक्या दिल्या गेल्या.आश्चर्याची बाब अशी की वारंवार जिल्हाअधिकारी कार्यालय भूसंपादन विभाग यांनी महापारेषेंचे बेकायदेशीर काम असल्याने संबंधित महापारेषण ठेकेदाराला उच्च दाब वीज वाहिनी मनोरे उभारणी थांबवणे बाबत कळविले असताना देखील महापारेषण ठेकेदाराने सौंदाळा,रांजणगाव ग्रामपंचायत हद्दीत बरीच टॉवर उभे केलेले आहेत.महापारेषण चे अधिकारी व नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस मोठ्या फोर्स फाट्यासह शेतकऱ्यांना कुठलीही अधिकृत नोटीस न देता , अगर न कळवता अचानक येऊन शेतकऱ्यांना धमकावून अपमानित करून मध्यरात्री पञकार व शेतकर्यांवर खोटे गुन्हे दाखल केले. एखाद्या मोठ्या गुन्हेगारा प्रमाणे त्या दिवशी पोलीस यंत्रणा शेतकऱ्यांना छळत होती. ज्या जागेवरती महापारेषण ठेकेदार पोलिसांना घेऊन आले त्या जागेचा एक रुपया नुकसान भरपाई देखील ठेकेदार ने शेतकऱ्यांना दिलेली नव्हती सौंदाळा ग्रामपंचायत ने ग्रामसभेचा ठराव संबंधित कंपनीला बेकायदेशीरपणे काम करू दिले जाणार नाही बेकायदेशीर पणे उभा केलेले टॉवर जप्त करावे असे असतानाही सौंदाळा ग्रामपंचायत ग्रामसभेचा ठराव पायदळी तुडवून महापारेषणच्या ठेकेदाराने अतिरेक चालवलेला होता .
शेतकर्यांची आपल्या हक्काची नुकसान भरपाई मागणे गुन्हा आहे का? मध्यरात्री पोलीस प्रशासनाला हाताशी धरून पञकार सह शेतकर्यांवर खोटे गुन्हा दाखल करून अटक करण्याची धमकी...
-कमलेश नवले (शेतकरी आंदोलनकर्ते)
महापारेषन सूडबुद्धीने सामाजिक कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करत आहे. लोकशाहीचे चौथा स्तंभ समजले जाणारे पत्रकार ही यात जाणीवपूर्वक गुंतवले गेले आहे. गुन्हे रद्द न झाल्यास आम्ही आक्रमकपणे आंदोलन करू.
-जैद शेख
भविष्यात यापुढे शेतकरी आणि महापारेषण चे ठेकेदार बळजबरीने बेकायदेशीर पणे जर शेतकऱ्यांच्या जीवितहानी झाल्यास महापारेषण चे ठेकेदार व पोलीस यांना जबाबदार धरण्यात यावे ज्या बाधित क्षेत्रामधून ही अति धोकादायक अती उच्च दाब वीज लाईन जाते त्या पूर्ण जमीनीचे मूल्य मातीमोल होते ती बाधित जमीन कुणीही विकत घेण्यास तयार होत नाही या प्रकल्पासाठी जी शासकीय कमिटी नेमलेली आहे त्यांच्याकडून देण्यात येणारा मोबदला एकदम तटपुंजा असून तो आम्हाला मान्य नाही.अशा प्रकारे अनेक गंभीर धोक्यांकडे उपविभागीय अधिकारी अहमदनगर यांनी डोळे झाक करून हा आदेश महापारेषण च्या ठेकेदारांना बक्षीस दिलेला होता तो रद्द करण्यासाठी व पञकार,शेतकर्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे रद्द करण्यात साठी वंचित बहुजन आघाडी नेवासा पक्षा तर्फे तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.या वेळी जिल्ह्य उपाध्यक्ष पोपट सरोदे,किरण सरोदे, दामोदर शिंदे, बबन आल्हाट,एकनाथ राऊत,योगेश गायकवाड,आकाश इगळे, ञिंबक भदगले, शिवाजी शिरसाठ,बाळासाहेब शिरसाठ,संजय ठुबे,लक्ष्मण पैहरे,जनार्दन शिंदे,अशोक आरगडे,महेश ठुबे,निलेश शिंदे,संभाजी बारे,आप्पासाहेब आरगडे,अक्षय बोधक,सुखदेव पाडळे,या वेळी शेतकरी संघटना,जीवन ज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र,छञपती युवा सेना अहमदनगर,सत्यमेव जयते प्रतिष्टान नेवासा संघटनेने जाहिर पाठिंबा दिला या प्रसंगी अनेक शेतकरी उपस्थित होते.