छत्रपती संभाजीनगर : काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आपल्या विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा दिला असून, ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची प्रतिक्रीया दिली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी निवडणूक आयोगाने चोरांच्या हातात दिली. आता काँग्रेस देखील अशोक चव्हाण यांच्या हातात देणार की काय? असा टोला ठाकरे यांनी लगावला. तर, अशोक चव्हाण यांचा आदर्श घोटाळा लपविण्यासाठी ते भाजपमध्ये गेले की काय असे म्हणत त्यांनी चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे.
भाजप भाडोत्री लोकं घेत असून सतरंज्या उचलणाऱ्याच्या बोकांडी बसवत आहेत. आत्मविश्वास नसल्याने भाजप फोडाफाडी करत आहेत. आणखीन काही वर्षानंतर भाजपचां अध्यक्ष सुद्धा काँग्रेसमधून आलेला असेल. एकाने शिवसेना भाजपच्या ताब्यात दिली. मी आव्हान केले असून, पोलिसांना बाजूला ठेवा लोकांना गोळा करू आणि विचारू शिवसेना कुणाची आहे. मला अशोक चव्हाण यांचे आश्चर्य वाटत आहे. आजपर्यंत सगळ्या जागा वाटपात वाटून घेण्यासाठी प्रयत्न करत होते आणि आता गेले, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण यांच्यासह भाजपवर हल्लाबोल केला आहे.
अधिक पाहा..