शनिशिंगणापूर देवस्थानच्या सुरक्षारक्षकावर जीवघेणा हल्ला, कामगारांचा काम बंद आंदोलनाचा इशारा

मुंबई :शनिशिंगणापूर (shani shingnapur) येथील देवस्थानच्या सुरक्षा रक्षकावर जीवघेणा हल्ला घटना समोर आलीये. या हल्ल्यात शनिशिंगणापूर देवस्थानचे सुरक्षारक्षक संदीप दरंदले हे गंभीर जखमी झालेत. रोडवर गाडी उभा न करता पार्किंग मध्ये गाडी उभा करा असे सांगितल्याने धारदार शास्त्राने सुरक्षा रक्षक संदीप दरंदले यांच्या डोक्यावर वार करण्यात आला. त्यानंतर आरोपी हा फरार झाला. देवस्थानच्या ठिकाणी जास्त प्रमाणात गर्दी होऊ नये यासाठी पार्किंगची व्यवस्था केली जाते. त्याची सूचना संदीप यांनी संबंधित व्यक्तीला दिली. परंतु त्या व्यक्तीने संदीप यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यानंतर कामगारांनी काम बंद आंदोलनाचा इशारा देखील दिलाय. 
संदीप हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. दरम्यान संध्या संदीप यांच्यावर अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये संदीप यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.शनिशिंगणापूर मध्ये आलेल्या भक्तांना आपल्या दुकानात पूजा साहित्य घेण्यासाठी आग्रह करणारे लटकू आणि प्रवाशांमध्ये नेहमीच वाद होत असतात. त्यांच्याच एका एजंटने सुरक्षा रक्षकावर हल्ला केल्याची माहिती समोर आलीये. सुरक्षारक्षकवर हल्ला करणाऱ्या आरोपीला जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत शनिशिंगणापूर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. 
देवस्थानच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकच असुरक्षित
दरम्यान या संपूर्ण घटनेमुळे देवस्थानच्या ठिकाणी सुरक्षारक्षकच असुरक्षित असल्याच्या चर्चा सध्या आहेत. त्यामुळे यावर मंदिर प्रशासनाने देखील कठोर भूमिका घेण्याची गरज असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे यावर मंदिर प्रशासन कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच कामगारांनी पुकारलेले कामबंद आंदोलन देखील काय वळण घेणार याकडे देखील लक्ष लागून राहिलं आहे. मंदिर परिसरात सुरक्षा रक्षकावरच हल्ला झाल्याने भाविकांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. 

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.