राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती घाडगे पाटील विद्यालय मुकिंदपुर नेवासा फाटा येथे उत्साहात संपन्न
नेवासा फाटा : घाडगे पाटील विद्यालय राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रतिकात्मक जिजाउच्या वेशभूषेत त्रिमूर्ती कन्या विभागाच्या मुलींनी सहभाग घेतला प्राथमिक विभागाचा प्रत्युष वनवे ,सिद्धी गाडे, ज्ञानेश्वरी भस्मे या विद्यार्थ्यांनी भाषणे केली सदर प्रसंगी परिपाठ सादर करण्यात आला परिपाठाचे सूत्रसंचालन इयत्ता नववी ब ची विद्यार्थिनी अपीना पटेल व अनुष्का महानोर यांनी केले त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य सोपानराव काळे सर, प्राचार्य सचिन कर्डिले सर होते ,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अशोक गाडे सर यांनी केले यावेळेस सर्व विभाग प्रमुख शिक्षक शिक्षिका व हजारोंच्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते त्यावेळेस प्राचार्य सोपानराव काळे सर यांचा महाराष्ट्र राज्य टीचर असोसिएशनच्या वतीने आदर्श प्राचार्य पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला