*नगर जिल्ह्यात कुणबीच्या ८५ हजार नाेंदी; समितीचे काम युद्धपातळीवर*
अहमदनगर
नगर जिल्ह्यात आजमितीला ८५ हजार प्रमाणपत्रांच्या नोंदी जिल्हा प्रशासनाच्या हाती आल्या आहेत. गेल्या सहा दिवसांत नगर जिल्ह्यात प्रशासनाने तब्बल ४६ लाख कागदपत्रे तपासली असून कुणबीच्या नाेंदी शाेधण्यासाठी युद्धपातळीवर माेहीम सुरू आहे. जिल्ह्यात आढळणार्या कुणबीच्या नोंदीची माहिती संकलित झाल्यावर ती राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार विभाग व जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्याबरोबर तालुकास्तरावर कक्ष स्थापन केला आहे. या कक्षामार्फत शोध मोहीम राबवण्यात येत आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने शाळांमधील शाळा सोडल्याचा रजिस्टरमधील नोंदणी तपासल्या आहे. यात चार हजारांहून अधिक नोंदी सापडल्या आहेत.