। नेवाशातील १६ ग्रामपंचायतींच्या उमेदवारी अर्जांच्या
छाननीत सदस्यांसाठीचे ८ अर्ज ठरले अवैध
नेवासा : अर्जांची छाननी काल तहसील कार्यालयात पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबरला मतदान होत असून पार पडली. छाननीत सरपंचपदाचे सर्व अर्ज वैध ठरले गोधेगावची एका सदस्याची जागा यावेळीही रिक्तच
ठरले तर सदस्यांसाठीचे चार ग्रामपंचायतींमधून ८
● तालुक्यातील गोधेगाव ग्रामपंचायतीच्या गेल्या
वर्षीच्या निवडणुकीत एक जागा एकही अर्ज
न आल्याने रिक्त राहिली होती. त्यामुळे आता
पोटनिवडणूक जाहीर झाली होती. यावेळी
देखील या जागेसाठी एकही अर्ज न आल्याने
ही जागा रिक्त राहिली आहे. अनुसूचित
जमाती प्रवर्गासाठी असलेली ही जागा आहे.
या गावात या प्रवर्गाची लोकसंख्याही आहे.
मात्र गावात अनुसूचित जातीच्या दाखल्यांची
व्हॅलिडीटी इच्छुकांकडे नसल्याने अर्ज दाखल
झाला नाही. नाशिकला जाऊन व्हॅलिडीटी
आणण्याचा त्रासामुळे कुणीही निवडणूक
लढवण्याच्या भानगडीत पडत नाही.
नेवासा तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींमधील
१६ सरपंच व १५८ सदस्य तसेच दोन सदस्यांच्या
पोटनिवडणुका अशा १६० सदस्यांसाठी अर्जांची
छाननी पार पडली. सरपंचपदासाठी एकूण १०० अर्ज
दाखल झालेले होते. ते सर्व वैध ठरले. सदस्यांसाठी
दाखल ५७८ (पोटनिवडणुकांसह) अर्जांपैकी ८ अर्ज
अवैध ठरल्याने एकूण ५७० सदस्यांसाठीचे उमेदवारी
अर्ज वैध ठरले आहेत. अवैध अर्ज ठरलेल्यांमध्ये
नागापूर ग्रामपंचायतीचे सर्वाधिक ४ उमेदवारी अर्ज
आहेत. देडगाव ग्रामपंचायतीचे २ तर शहापूर व
कौठा ग्रामपंचायतीच्या सदस्यांसाठीचे प्रत्येकी एक
अर्ज अवैध ठरलेले आहेत.