अंकुश चत्तर खून प्रकरणातील सात आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या.
अहमदनगर
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक १५/०७/२०२३ रोजी आदित्य गणेश औटी याचे काही मुलांशी भांडण झाल्याने अंकुश चत्तर हा मुलांचे भांडण सोडवण्यासाठी आला असता यातील ७ ते ८ आरोपी काळे रंगाचे कार मधुन येवुन पुर्ववैमनस्यातुन स्वप्निल शिंदे याने दिलेल्या चिथावणीवरुन अंकुश चत्तर यास जिवे ठार मारण्याचे उद्देशाने हातातील लोखंडी रॉड, काचेच्या बाटल्या, वायर रोप व गावठी कट्टा घेवुन जोराजोरात आरडा ओरडा व दहशत निर्माण
केली. तसेच रस्त्याने येणारे जाणारे लोक व दुकानदार यांचेवर धाक निर्माण करून अंकुश चत्तर याचे डोक्यात लोखंडी रॉडने मारुन गंभीर जखमी केले. सदर घटने बाबत फिर्यादी श्री. बाळासाहेब भानुदास सोमवंशी, वय ४२, रा. वांबोरी,ता. राहुरी हल्ली रा. गावडेमळा, पाईपलाईन रोड, अहमदनगर यांनी दिलेल्या तक्रारी वरुन तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. १०३० / २३ भादविक ३०७, ३२३, ३२४, ३२५, ३२६, १४३, १४७, १४८, १४९, १०८ सह आर्म अॅक्ट ३/२५ व म.पो.का.क. ३७ (१)(३)/१३५, क्रि.लॉ.अॅ.अ. ७ प्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. जखमी अंकुश चत्तर हा उपचारा दरम्यान मयत झाल्याने गुन्ह्यास ३०२ हे वाढीव कलम लावण्यात आले आहे.
सदर घटना गंभीर स्वरुपाची व संवेदनशील असल्याने मा. श्री. राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक,
अहमदनगर यांनी घटना ठिकाणास भेट देवुन पोनि / श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना गुन्ह्याचा समांतर तपास करुन फरार आरोपींना अटक करणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशा प्रमाणे पोनि / श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि / गणेश वारुळे, हेमंत थोरात,
पोसई / तुषार धाकराव, सफौ/ भाऊसाहेब काळे, पोना / रविंद्र कर्डीले, संतोष खैरे, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष लोढे, भिमराज खर्से, पोकॉ/बाळु खेडकर, अमृत आढाव, किशोर शिरसाठ, चापोहकों / चंद्रकांत कुसळकर, चापोकॉ/ अरुण मोरे तसेच सफी / राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, बाळासाहेब मुळीक, पोहेकॉ/सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, अतुल लोटके, संदीप पवार, बापुसाहेब फोलाणे, विजय वेठेकर, विश्वास बेरड, देवेंद्र शेलार, पोना / विशाल दळवी, संदीप दरदंले, लक्ष्ण खोकले, फुरकान शेख, विशाल गवांदे, पोकॉ/रोहित येमुल, रविंद्र घुगांसे, सागर ससाणे, प्रशांत राठोड व चापोहेकॉ/अर्जुन बडे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांची तीन वेगवेगळी पथके तयार करुन गुन्ह्यातील आरोपींचा शोध
घेवुन कारवाई करणे बाबत सुचना देवुन पथकास तात्काळ रवाना केले.पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार फरार आरोपींचा सीसीटीव्ही फुटेज पाहुन आरोपींची ओळख पटवुननगर शहर परिसरात शोध घेत होते. तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासताना आरोपी हे काळ्या रंगाची एमजी कंपनीचे कार क्रमांक एमएच/१६/सीएक्स / ९३९३ मधुन अहमदनगर, शेवगांव, पैठण, बिडकीन मार्गे वाशिमकडे जाताना दिसल्याने
पथकाने तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास करुन वाशिम येथे जावुन आरोपीचा शोध घेत असताना आरोपींची काळ्या रंगाची कार हॉटेल गुलाटीचे बाहेर उभी असलेली पथकस दिसली. पथकाची खात्री होताच हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या इसमाकडे सदर कार बाबत विचारपुस करता त्याने कारमधील इसम हॉटेलमध्ये राहण्यास आहेत अशी माहिती प्राप्त झाल्याने हॉटेल रुममधील इसमांना ताब्यात घेवून पोलीस पथकाने ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे १) स्वप्निल रोहिदास शिंदे वय ४०, रा. गुरुकृपा सोसायटी, श्रमिक बालाजी चौक,अहमदनगर, २) अक्षय प्रल्हादराव हाके वय ३३, रा. नंदनवन नगर, बंधन लॉन मागे, सावेडी अहमदनगर, ३)अभिजीत रमेश बुलाख वय ३३, रा. दिपवन अपार्टमेंट, गजराज फॅक्ट्ररी जवळ, बेहस्तबाग, अहमदनगर, ४) महेश नारायण कु-हेवय २८, रा. साईनगर, वाघमळा, सावेडी, अहमदनगर, ५) सुरज ऊर्फ विकी राजन कांबळे वय २५, रा.भुतकरवाडी, सावेडी अहमदनगर असे सांगितले. ताब्यातील संशयीताकडे अधिक विचारपुस करता त्यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना कार व त्यांचे मोबाईलसह ताब्यात घेतले.