नेवाश्यात यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता मोहीम
प्रतिनिधी.
कामिका एकादशी निमित्त श्री क्षेत्र नेवासा येथे दरवर्षी होणाऱ्या यात्रेच्या दुसऱ्या दिवशी आ शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या व श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा यांच्या वतीने नेवासा शहरातील श्री ज्ञानेश्वर मंदिर परिसर रस्ता,तुकाराम महाराज मंदिर परिसर, नगरपंचायत चौक, चिंचबन रस्ता आदींची स्वच्छता शुक्र दि 14 जुलै 2023 रोजी सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत युवा नेते उदयन गडाख उपाध्यक्ष यशवंत सामजिक प्रतिष्ठान सोनई यांच्या उपस्थितीत यशवंत सामजिक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते,श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे
विद्यार्थी ,प्राध्यापक आदींच्या उपस्थितीत करण्यात आली.
प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व विद्यार्थी यांनी स्वच्छता मोहिमेत उत्साहाने सहभागी होत नेवासा शहराची स्वच्छता केली.
स्वच्छता मोहीम झाल्यानंतर
श्री क्षेत्र नेवासा ज्ञानेश्वर मंदिर येथे
ह भ प शिवाजी महाराज देशमुख श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान नेवासा यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश मापारी यांनी केले.
याप्रसंगी बोलतांना उदयनदादा गडाख म्हणाले
गेल्या पाच वर्षापासून कामिका एकादशीच्या दुसऱ्या दिवशी यशवंत प्रतिष्ठानच्या वतीने यशवंत प्रतिष्ठान कार्यकर्ते व श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय विद्यार्थी श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर व नेवासा शहर परिसर स्वच्छता करतो यातून मनाला मोठी ऊर्जा मिळते
ज्ञानेश्वरांच्या भूमीतील ही सेवा काम करण्यास सकारात्मक काम करण्यास प्रेरणा देते विद्यार्थी व प्रतिष्ठानचे सदस्य हा उपक्रम दरवर्षी राबविण्यासाठी कटिबद्ध आहोत.
असे उदयन गडाख म्हणाले.
याप्रसंगी बोलतांना ह भ प शिवाजी महाराज देशमुख म्हणाले
दरवर्षी प्रतिष्ठान सदस्य व श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे विद्यार्थी श्री ज्ञानेश्वर मंदिर परिसर स्वच्छता मोहीम राबवता हा उपक्रम प्रेरणादायी आहे
माऊलींच्या दारी स्वच्छता वारी हीच खरी सेवा आहे
गडाख कुटुंबाची सेवेची परंपरा उदयन गडाख जपत आहेत.
माऊलींच्या चरणी सेवा करणाऱ्यांना माऊलींचा आशीर्वाद मिळतो असेही देशमुख महाराज म्हणाले
याप्रसंगी
संतोष महाराज चौधरी,नेवासा शहरातील मा नगराध्यक्ष,सर्व मा नगरसेवक,विविध संस्थांचे पदाधिकारी,यशवंत प्रतिष्ठानचे कार्यकर्ते,श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासाचे सर्व विद्यार्थी,प्राचार्या,प्राध्यापक आदींसह शहरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्ञानेश्वर महाराज मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम दरवर्षी प्रतिष्ठानचे सदस्य व श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय विद्यार्थी यांचेसह राबविण्यासाठी प्रयत्नशील राहू.
मंदिर परिसर स्वच्छता मोहिमेतून मनाला मोठे आत्मिक समाधान लाभले.
उदयन गडाख
उपाध्यक्ष
यशवंत सामाजिक प्रतिष्ठान.