पिचडगाव.
नेवासा तालुक्यातील पिचडगाव येथे एका शेतकऱ्याच्या शेतामधून रात्री अज्ञात व्यक्तीकडून लाल माती व मुरूम चोरून नेण्याची घटना घडली आहे याबाबत शेतकरी बंडू ससाने यांनी अशी माहिती दिली आहे की दिनांक 14 रोजी अज्ञात व्यक्तीने डंपरच्या साह्याने त्याच्या शेतामधील मुरूम विक्री करण्याच्या उद्देशाने ससाणे यांना कोणत्या प्रकारची माहिती न देता चोरून नेण्याचा प्रकार पिचडगाव येथे घडला आहे हा प्रकार यांच्या लक्षात दिनांक 15 रोजी सकाळी वावरात गेले असता तेव्हा निर्देशनात आला आहे तरी प्रशासनाने या मुरूम चोराचा लवकरात लवकरच बंदोबस्त करावा अशी त्यांची मागणी आहे आहे याबाबत सागर सरोदे यांनी तलाठी व तहसीलदार यांच्याशी फोनवर संपर्क साधून प्राथमिक माहिती दिली आहे त्यावर तलाठी यांनी सदरील जागेचा पंचनामा करणार असल्याचे सांगितले आहे तसेच याबाबत ससाने स्थानिक पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे