*बनावट आधार कार्डने हजारो सिम कार्डची विक्री; नगरमध्ये दोन आरोपी ताब्यात*
अहमदनगर.
बनावट आधार कार्डच्या माध्यमातून राज्यात हजारो सिम कार्ड विकणाऱ्या व्यावसायिकांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी सर्व सर्व पोलीस अधीक्षकांना तसे पत्र दिले आहे. नगर येथे दोन ठिकाणी पोलिसांनी कारवाई करून दोन जणांना ताब्यात घेतले असून 180 सिम कार्ड जप्त केले आहे
http://www.maharashtranewsprince.in/2023/07/blog-post_16.html
💥💥💥💥💥💥💥
*आई. सी. ए.आर.स्थापना दिवसाच्या निमित्ताने केव्हीके, दहिगाव -ने च्या वतीने तंत्रज्ञान दिवसाचे आयोजन*
💥💥💥💥💥💥💥
राज्यातील 75 सिम कार्ड विक्रेत्यांकडून आधार कार्ड आणि फोटोचा गैरवापर करत एकाच नावाने अनेक सिम कार्ड नोंदवल्याचा प्रकार उघड झाला आहे या विक्रेत्यांनी हजारो सिम कार्ड बनावट कागदपत्रांच्या आधारे तयार केले आहेत. नगर शहरातील तागड वस्ती येथून एका सिम कार्ड विक्रेत्याला तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. त्याच्याकडून 108 सिम कार्ड जप्त केले आहेत तर पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील एका सिम कार्ड विक्रेत्याला पाथर्डी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्या त्याच्याकडून 72 सिम कार्ड जप्त केले आहेत.