शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्था पुनतगाव यांच्यावतीने पुनतगाव येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली पुनातगाव येथे शिवस्वराज्य संस्थेच्या वतीने कानिफनाथ देवस्थानचे मठाधिपती योगी दीपक नाथ जी महाराज व गावचे माजी सरपंच प्रगतशील शेतकरी साहेबरावजी पवार साहेब या मान्यवरांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेवर फुल पुष्पांचा वर्षाव केला
यावेळी कानिफनाथ देवस्थान चे मठाधिपती योगी दीपक नाथ जी महाराज यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या धर्म एकनिष्ठतेबद्दल संपूर्ण इतिहासाची माहिती दिली यावेळी सर्व मान्यवरांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेवर फुलपुष्पांचा वर्षाव केला यावेळी कानिफनाथ देवस्थानचे मठाधिपती योगी दीपक नाथ जी महाराज माननीय श्री साहेबराव पवार प्रगतशील शेतकरी माजी सरपंच माननीय श्री सुधाकरराव पवार अनंत विकास सहकारी सोसायटीचे संचालक माननीय श्री शिवाजी अण्णा पवार सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री गंगाराम पाटील वाकचौरे मालक माननीय श्री रफिक उर्फ तोताराम शेख माननीय श्री भाऊसाहेब वाघमारे माननीय श्री अमोल वाघमारे श्री महेश वाघमारे श्री उदय वाघमारे हे मान्यवर उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष समाजभूषण संजय वाघमारे व सचिव सौ ताई साहेब उर्फ रमाबाई वाघमारे यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले माननीय श्री बाबासाहेब शिरसाट यांनी आभार मानले व सर्व बांधवांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या