माळचिंचोरा लाखेफळ येथील धरणग्रस्तांची ची मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्या दालनात बैठक घ्या

माळीचिंचोरा.(लाखेफळ) प्रतिनिधी 
माळचिंचोरा लाखेफळ येथील धरणग्रस्तांची ची मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्या दालनात बैठक घ्या,  जमीन मिळून 40 वर्षे झाले परंतु मूळ मालकांकडून धरणग्रस्तांना  ताबा नाही ,व 45 एकर जमीन धरणात गेली व 1993  साल ला चार एकर जमीन मिळाली परंतु आज पर्यंत ताबा नाही ,तसेच जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडे वाटप रजिस्टर ला नाव आहे ,व जमीन वाटप आदेशात नाव आहे परंतु आजोबाकडे चलन भरायचे राहिले मग नातवाकडून का भरून घेतले जात नाही, तरी चलन भरून घेऊन सदर लाभार्थ्यांच्या सातबारा उतारा करण्यात यावा ,अशा विविध मागण्यांसाठी  लाकेफळ येथील धरणग्रस्तांनी निवेदन दिले आहे परंतु अद्याप पर्यंत, जायकवाडी धरणग्रस्तांचा प्रलंबित मागणीला शासन दरबारी ५० वर्षे उलटूनही न्याय मिळाला नाही. त्यामुळे लाखेफळ येथील धरणग्रस्त कृती समितीचे समन्वयक दिगंबर आवारे यांनी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली कृती समितीच्या सदस्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात बैठक लावून धरणग्रस्तांच्या प्रश्नावर  तोडगा काढण्याची मागणी खासदार लोखंडे यांच्याकडे केली होती, त्यानुसार खासदार लोखंडे यांनी  सदर निवेदनाची सदरील निवेदनाची दखल घेऊन पुढे मंत्रालयात देऊन सुद्धा अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची बैठक न झाल्यामुळे धरणग्रस्त आवारे व इतर ग्रामस्थ
यांची मागणी असताना धरणग्रस्तांना न्याय मिळण्यासाठी अनेकदा शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे. मात्र,धरणग्रस्तांचे प्रश्न आजही कायम आहे. धरणग्रस्तांच्या ज्वलंत प्रश्नावर
सातत्यानेच आवाज उठवत असून शासनातील
अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत  नसल्यामुळे
अधिकारी सहानुभूतीपूर्वक धरणग्रस्तांच्या समस्या समजावून घेत नसल्याचा आरोपही आवारे यांनी केला. खासदार लोखंडे यांच्यामुळे अनेक समस्या सोडविण्यात आलेल्या आहेत.या प्रश्नावर आता खासदार लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच मंत्रालयात मुख्यमंत्री शिंदे यांच्या दालनात बैठक लावण्यासाठी धरणग्रस्त कृती समितीने खासदार लोखंडे यांच्याकडे पाठपुरावा सुरू केलेला आहे. आता मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत केव्हा बैठक होते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.