नेवासा- अमोल मांडण
नेवासा- शहरातील परळी पीपल्स पतसंस्था व संचालक मंडळा विरोधात ठेवीदारांचा आंदोलनाचा इशारा..
नेवासा शहरातील परळी पीपल्स पतसंस्थेच्या शाखेच्या, संचालक व सर्व कर्मचारी विरोधात आक्रमक असा आंदोलन करीत तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी नेवासा शहरातील सर्वच नामवंत व्यापारी ठेवीदार व खातेदार यांनी एकत्र येत आवाज उठवला. गेल्या चार वर्षापासून बंद अवस्थेत असलेल्या या पतसंस्थेच्या संचालक मंडळांचा गैर कारभार उघड आणण्यासाठी आज नेवासा पंचक्रोशीतील अनेक ठेवीदार व खातेदार एकत्र आले होते. गरजवंतांच्या ठेवी या पतसंस्थेत असल्याने गरजवंत खातेदारांचा बोलताना अश्रू अनावर होत होते. परळी पीपल्स पतसंस्थेवर गुन्हा नोंदवून योग्य ती कारवाई न झाल्यास व ठेवीदाराच्या पैशासाठी योग्य ते पाऊल न उचलल्यास तीव्र आंदोलन किंवा आत्मदानाचा इशारा ठेवीदारांनी दिलेल्या निवेदनात दिला आहे. या आंदोलनात खातेदार शशिकांत नळकांडे, अभय गुगळे, संतोष कुटे, प्रसाद लोखंडे, रिजवान सय्यद, दर्शन शिंगी, पठाण बंधू, राजेश उपाध्ये, विनोद नळकांडे, जीवनी जीक्रिया, आनंद डौले, शरद उगले, अमित विखोना, अमोल सुरोशे, डवले मेजर, सुनील डोहाळे आदींच्या निवेदनावर सह्या आहे.