नेवासा.
ज्ञानेश्वर महाविद्यालयासमोर पाण्याच्या बिसलेरी बॉक्स घेऊन जाणारा आयशर टेम्पो पलटी झाला समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज न आल्याने आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घडली आहे. यामध्ये टेम्पो चालकाला किरकोळ इजा झाली असून बिसलेरी पाणी बाटल्यांचे मोठे नुकसान झाले आहे या अपघातात वाहन चालक किरकोळ जखमी झाला असून टेम्पोमध्ये असलेले बिसलेरी बॉक्स खाली पडल्याने मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले. या अपघातानंतर नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन रस्त्यावरील टेम्पो बाजूला घेतला आणि वाहतूक सुरुळीत केली.