एकच जेसीबी 4 व्यक्तींना विकून केली चाळीस लाखाची फसवणूक
नेवासा
एकच जेसीबी अनेक व्यक्तींना विकणारा
अन्वर युसुफ शेख ,रा.सिल्लोड रोड ,आळंद याने एकच जेसीबी 4 व्यक्तींना विकून केली चाळीस लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार अहमदनगर जिल्ह्यात घडला आहे या फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने नेवासा तालुक्यातील वर्ष 2019मध्ये नेवासा येथील परदेशी यांना जेसीबी विकून त्यांचाकडून सुमारे 9लाख रुपये रक्कम घेतली व काही दिवसांनी त्यानंतर तो जेसीबी परदेशी यांच्या साईटवर चालू असताना त्याच्यावर वाच ठेऊन तो जेसीबी भाड्याचे गुंड लाऊन पळून नेला, व काही दिवसांनी त्यानंतर तो जेसीबी अलीम पठाण राहणार , तूर्काबद करडी तालुका गंगापूर.यांना100000रू विकला व त्यांच्यासोबत पण सहा महिन्यानंतर तसेच भाड्याचे गुंड लाऊन तो जेसीबी पुन्हा घेऊन गेला व त्यानंतर तो जेसीबी अहमदनगर येथील जेसीबी चे मोठे उद्योजक असलेले आढव पाटील यांना विकला व त्यांच्याकडून 900,000लाख रोख घेऊन 11,00000रू हप्ते भरून घेतले असा एकूण 4000000 चाळीस लाख रुपयाची फसवणूक शेख अंवर शेख युसुफ याने केली आहे या सर्व प्रकरणाचा उलगडा या सर्व मालकांच्या लक्षात आल्यावर हा महा ठग अशाच प्रकारच्या फसवणुकीचा व्यवसाय करत असल्याचे अनेक लोकांनी सांगितले व यांनी अशाच प्रकारे अनेकांना गंडा घालून फसवणूक केली आहे यामुळे या सर्व जेसीबी मालकांच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झाली आहे त्यामुळे या सर्वांनी पोलीस स्टेशनचे मदतीसाठी धाव घेतली आहे व आपली फसवणूक कशा प्रकारे झाल्याची सांगत आहे याबाबत आपली फसवणूक झाल्याची माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना काही जेसीबी मालकांनी सांगितली आहे.