........अहमदनगर जिल्ह्यात सव्वा लाख 'सुकन्या'*
अहमदनगर
केंद्र शासनाने मुलींच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पोस्ट विभागातर्फे सुरू केलेल्या सुकन्या समृद्धी योजनेला अहमदनगर जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात एक लाख १० हजार ३३० मुलींची खाती उघडण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारी २०१५ रोजी देशात ही योजना लागू केली. या योजनेअंतर्गत शून्य ते दहा वयोगटातील एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींचे खाते सुकन्या योजनेअंतर्गत उघडले जाऊ शकते. मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी
सुकन्या समृद्धी योजना ही मुलींच्या सुरक्षित व उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाची आहे. दर वर्षी या योजनेमध्ये जमा होणाऱ्या रकमेवर केंद्र शासनाने निश्चित केल्यानुसार चक्रवाढ दराने वाढीव रक्कम याच खात्यात जमा केली जाते. या योजनेत गुंतवलेल्या रकमेवर मिळणारा व्याजदर सर्वाधिक आहे. आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने भारतीय पोस्ट विभागाच्या सुकन्या समृद्धी योजनेचा प्रत्येक पालकाने लाभ घेण्याचे आवाहन सहायक पोस्ट अधीक्षक संदीप हदगल यांनी केले आहे