नेवासा- अमोल मांडण
नेवासा- तालुक्यातील मक्तापूर येथे हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती जिल्हा परिषद शाळा मक्तापूर येथे साजरी करण्यात आली यावेळेस लहान मुलांना चॉकलेट व खाऊचे वाटप करण्यात आले. मक्तापूर शिवसेना शाखा व मराठा सुकाणु समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश झगरे यांच्यावतीने
हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी करण्यात आली.यावेळी मुख्याध्यापक सुभाष चव्हाण, शिक्षक गोरक्षनाथ नवघरे, जगदाळे मॅडम, सुनील गोरे, योगेश गायकवाड, सचिन साळवे, सतीश बर्डे, अनिल गोरे, सचिन गायकवाड मक्तापूर ग्रामस्थ व पालक व शिवसैनिक उपस्थित होते.