पुणे
कौटुंबिक हिंसाचाराच्याप्रकरणामध्ये दाखल गुन्ह्यातील आरोपपत्रामध्ये मदत करण्यासाठी आणि तक्रारदारांच्य आईवडिलांना अटक न करण्यासाठी ५० हजारांची लाच मागणाऱ्या कोंढवा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक व
पोलीस शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून, दोघेही फरार आहेत.सहायक पोलीस निरीक्षक हर्षदा बाळासाहेब दगडे आणि पोलीस शिपाईअभिजीत विठ्ठल पालके यांच्यावर याप्रकरणी
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका २७ वर्षीय तरुणाने 'एसीबी'कडे याबाबत तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक राजेश
बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव व
पोलीस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण
निंबाळकर यांच्या पथकाने केली.