राकेश ओला अहमदनगरचे नवीन एसपी.

💥राकेश ओला अहमदनगरचे नवीन एस पी💥
अहमदनगर.
राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश गृहविभागाने गुरुवारी रात्री उशिराने
काढले. त्यात मनोज पाटील यांची बदली झाली असून राकेश ओला यांची नगरचे नवे एसपी म्हणून
नियुक्ती करण्यात आली आहे. ओला हे शनिवारी (दि. २२) रोजी नगरचा पद्भार स्वीकारणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सोलापूर येथून मनोज पाटील यांची नगरला एसपी म्हणून ऑक्टोबर २०२० रोजी बदली झाली होती.
नगर जिल्हा राज्यात चर्चेला आला.त्यानंतर पाटील यांच्या बदलीचे आदेश निघाले. ओला हे २०१२ च्या
बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.नागपूर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे एसपी म्हणून ते कार्यरत होते. आता त्यांची बदली नगरचे एसपी म्हणून झाली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.