नेवासा,
नेवासा बुद्रुक येथील गावात जाणाऱ्या मुख्य कमानी समोरील चौकाचे श्री खंडोबा म्हाळसा
चौक असे नामकरण पाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आले.तीर्थक्षेत्र नेवासा बुद्रुक हे खंडोब देवाची सासूरवाडी असून आदिमाया शक्ती म्हाळसादेवीचे माहेरघर आहे. या स्थानावर खंडोबा म्हाळसाचे पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. येणाऱ्या भाविकांना मंदिर मार्ग व स्थान कळावे म्हणून फलक बसवून श्री खंडोबा
म्हाळसा चौक असे नामकरण करण्यात आले.
या वेळी फलकाचे अनावरण शिवाजी महाराज देशमुख यांच्या हस्ते, करण्यात आले यावेळेस गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.या कार्यक्रमानंतर हभप
शिवाजी महाराज देशमुख यांनी गावातील पुरातन खंडोबा म्हाळसादेवी मंदिरात जाऊन
खंडोबा म्हाळसादेवी, बानूबाईचे दर्शन घेतले. मंदिराच्या आतील ग्रॅनाईट कामाचा प्रारंभ देशमुख महाराजांच्या हस्ते करण्यात आला.