शासनाने सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा- आमदार शंकरराव गडाख पाटील उद्धव ठाकरे समर्थक
नेवासा.
सर्वाधिक अतिवृष्टीचा फटका बसलेल्या नेवासा तालुक्यात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आ अंबादास दानवे यांनी आ शंकरराव गडाख यांचेसह अतिवृष्टीने फटका बसलेल्या पिकांचा शनीशिंगणापूर व इतर ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली.
अतिवृष्टीमुळे नेवासा तालुक्यातील पिकांची जी दायनिय अवस्था निर्माण झाली आहे याबद्दल शासनाने मदत करावी.
तसेच राज्य शासनाला शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे घेणेदेणे राहिले नाही आहे.राज्यात शासन फक्त नावालाच राहिले आहे अशी स्थिती आहे.
शेतकरी विरोधी शासनाला जाग आणल्याशिवाय शांत बसणार नाही असेही दानवे म्हणाले.
याप्रसंगी बोलतांना आ शंकरराव गडाख म्हणाले की नेवासा तालुक्यातील 40 हजार हेक्टरवरील कपाशी,सोयाबीन,मका,कांदा, ऊस ,तुर, फळबागा व सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीत शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झाले आहे आहे.शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना भरीव मदत करावी तसेच विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांनी विमा भरूनही एकरी 1000 रु देऊन विमा कंपन्यानी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे.शासनाने विमा कंपन्यांना आदेश देऊन जास्तीत जास्त पिक विमा रककम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून शेतकऱ्यांची फसवणूक दूर करावी व शेतकऱ्यांना संकटात आधार द्यावा अशी मागणी आ शंकरराव गडाख यांनी केली आहे.
याप्रसंगी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,आ शंकरराव गडाख,नेवासा तहसीलदार रुपेशकुमार सुराणा,गटविकास अधिकारी संजय दिघे,तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे आदींसह नेवासा तालुक्यातील शेतकरी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.