श्रीरामपूर.
श्रीरामपूर शहरातील अल्पवयीन मुलीला पळून नेत तीचे धर्मांतर केले व नंतर विवाह करत तिच्यावर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी मुल्ला कटर व त्याच्या टोळीला मदत केल्याप्रकरणी चौकशीत दोष आढळल्याने श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय सानप यांना जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी निलंबित केले .
नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्या आदेशाने अधीक्षक पाटील यांनी ही कारवाई केली. श्रीरामपूर शहरातील १३ वर्षे अल्पवयीन मुलीच पळून नेऊन तिचे धर्मांतर करण्यात आले होते. त्यानंतर तिच्याबरोबर विवाह करण्यात आला. तीन वर्ष तिच्यावर अत्याचार केले गेले. याप्रकरणी मुल्ला कटरसह आणखी तिघांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यात अटक झाल्यानंतर आरोपी कोठडीत आहेत. या गुन्ह्याचा तपास आता उपअधीक्षक संदीप मिटके करत आहेत.
गुन्ह्याचा तपास करत येत आहे. परंतु निरीक्षक सानप हे आरोपींना मदत करत आहेत, असा आरोप फिर्यादी महिलेने केला होता. याबाबत महिलेने अधीक्षक पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. या प्रकरणाची शहानिशा केल्यानंतर निरीक्षक सानप यात दोशी आढळले. हिंदुत्ववादी संघटना चे बेग यांनी या पीडित महिलेला व तिच्या आईला वेळोवेळी सहकार्य केल्यामुळे न्याय मिळवून दिला व वेळोवेळी आंदोलन करून या घटनेचा पाठपुरावा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन निर्देशनात आणून दिल्याची चर्चा आहे श्रीरामपूर शहरात आहे.