नेवासा.
नेवासा तालुक्यातील नेवासा बुद्रुक ते उस्थळ खालसा शिव रस्ता खुला करून घेण्यासाठी नेवासा बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी नेवासा तहसील समोर दिनांक 1,6 पासून अमरण उपोषण करण्यासाठी बसले आहे आमरण उपोषणासाठी बसण्याचे निवेदन देण्यासाठी नेवासा तहसीलदार यांच्याकडे गेले असता नेवासा तहसीलदार व आवक-जावक विभाग यांनी निवेदन घेण्यास टाळाटाळ केली आवक-जावक विभागाने तर सर्व शेतकऱ्यांना असे सांगून टाकले की तहसीलदार यांनी रस्ता खुला करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे निवेदन न घेण्यास सांगितले आहे आत्ता हंगामासाठी शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी व मालाची ने आण करण्यासाठी इतरांच्या वावरातून आपल्या शेतात जावे लागते पण काही शेतकरी जाण्यासाठी अडथळा निर्माण करतात व भांडणे विवाद सतत होत असतात सदरील रस्ता बाबत 2006 पासून शेतकरी झगडत आहेत परंतु अद्यापपर्यंत कोणी हा रस्ता मोकळा केला नाही रस्ता अधिकृत असताना सुद्धा वेळोवेळी तहसीलदारांन सांगून सुद्धा हा रस्ता मोकळा झाला नाही व अतिक्रमणे कायम राहिली हे अतिक्रमण काढण्यासाठी शेवटी नेवासा बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांनी निवेदन न स्वीकारल्यामुळे पोस्टाने निवेदन दिले, यावेळेस मोठ्या संख्येने शेतकरी उपोषणास बसले आहे या उपोषणाला भेट देण्यासाठी आलेले नेवासा बुद्रुकचे सरपंच प्रकाश सोनटक्के असे म्हटले की या रस्त्यासाठी बऱ्याच दिवसापासून प्रयत्न चालू आहे यावर शेवटी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी नामदार शंकरराव गडाख या रस्ता प्रश्नातून लवकरात लवकर काहीतरी मार्ग काढतील असे उपस्थितांना म्हंटले . हे उपोषण करण्यासाठी दिलेल्या निवेदनावर अलीम पठाण रोहन सोनवणे अशोक सोनवणे अक्षय दळवी अनिल डोलै महेश डोलै निसार शेख संदीप सुरोशे शिवाजी काळे अण्णा तोडमल माऊली तोडमल सह आदी व्यक्तींच्या सह्या आहे.