नेवासा फाटा (मुकिंदपुर.)
मुकिंदपुर नेवासा फाटा शिव महाराणा प्रताप चौक येथे ,सालाबादप्रमाणे महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, याप्रसंगी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल राणा परदेशी व ,उपाध्यक्ष सचिन परदेशी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले, तसेच नन्नवरे यांनी महाराणा प्रताप की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय ,जय लहुजी जय महाराष्ट्र अशा घोषणा दिल्या ,उपस्थित सर्वांनी या घोषणांना प्रतिसाद दिला, कार्यक्रम शांततेत व सुव्यवस्थित पार पडण्यासाठी ,प्रिन्स दरबार मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बादल भाऊ परदेशी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले ,व यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पाडण्यात आला ,या कार्यक्रम प्रसंगी अविनाश कनगरे, आणिल मंडलिक, एजाज पटेल, स्वप्निल शिरसाट, हातिम सय्यद, लखन बर्डे, कदीर शेख ,कचर डुकरे ,शिवाजी विटकर, प्रकाश बोरुडे ,संदीप सोनवणे, मामू पठाण, मिसाळ मिस्तरी, दत्तू जाधव, ऋषिकेश नेमाने,बंटी जाधव, अजय धोत्रे ,शंकर शिरसाट, सुरज परदेशी ,शेखर अहिरे, बापू सौदागर ,महाराष्ट्राचे भाऊ पाटील ,सह आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.