महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख पाटील, व जिल्हा परिषद अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती मा.सुनीलभाऊ गडाख पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने,ग्रामपंचायत मुकिंदपुर व जिल्हा परिषदेच्या विविध योजनांतर्गत मौजे मुकिंदपुर ता.नेवासा येथील विविध विकास कामांचा शुभारंभ व उद्घाटन समारंभ सोहळा, मा.सभापती सुनिताताई शंकरराव गडाख पा. यांच्या शुभहस्ते करण्यात आला. त्यामध्ये मुकिंदपुर हिवरा रोड ते गाढव नाला पर्यंत खडीकरण करणे 20 लाख रू, ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधकाम 25 लाख, व ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या विवीध कामांचा समावेश आहे.एकुण 1कोटी 47 लाख रू या कामाचा लोकार्पण व भुमिपुजन सोहळा पार पडला. प्रसंगी पंचायत समिती मा सभापती रावसाहेब पाटील कांगुणे मा. उपसभापती किशोरभाऊ जोजार, सरपंच सतीश दादा निपुंगे, उपसरपंच गणेश भाऊ माटे, मा उपसरपंच अरुण निपुंगे, पांडुरंग आप्पा निपुंगे, संजय कराडे, लक्ष्मण कराडे, आदेश साठे, भास्कर राव लिहीणार, गणपत मोरे, पि आर जाधव साहेब, माऊली भाऊ देवकाते, एड राजूभाई इनामदार, ऍड प्रदीप वाखुरे, पत्रकार राजेंद्र वाघमारे, पत्रकार चंद्रकांत दरंदले, पत्रकार बाळासाहेब देवखीळे, ग्रामसेवक खंडागळे भाऊसाहेब, नामदेव कराडे, बाबासाहेब साळवे, संजूबाबा गायकवाड, संतोष साळवे, संजय कराडे, सोपान कराडे, सिताराम निपुंगे, अशोक निपुंगे, दीपक अकोलकर, शिवाजी माळवदे, विठ्ठलराव उंदरे, ग्रामपंचायत सदस्य, व वि.वि.सोसायटी सदस्य, सर्व युवक व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.. सर्व नागरिकांनी यावेळी नामदार शंकरराव गडाख साहेब यांचे आभार मानले..