नेवासा फाटा (मुकिंदपूर)
डॉ.बाबासाहेब आंबेडकर एकता समिती नेवासा तालुक्याच्या वतीने बौद्ध पोर्णिमे निमित्त नेवासा फाटा येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी गणपतराव मोरे व पोलीस पाटील आदेश साठे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले .यावेळी मुकिंदपुर गावचे लोकनियुक्त सरपंच सतिष उर्फ दादा निपुंगे,उपसरपंच गणेश माटे,पोलीस पाटील आदेश साठे,सामाजिक कार्यकर्ते गणपतराव मोरे,भास्करमामा लिहिणार,बि.बि.पंडित,नगरसेवक सचिन नागपुरे,ग्रा.पं.सदस्य,भैय्या मते,बाळासाहेब केदारे,पी.आर.जाधव,मराठा सूकाणु समितीचे गणेश झगरे,प्रा.रविंद्र आल्हाट,सोलट साहेब,निकम साहेब,फलटणकर साहेब,ग्रामसेवक सुरेश पुरी आदी मान्यवरांनी मानवंदना दिली.