नेवासा( घोडेगाव)
मंत्री शंकरराव गडाख यांचे पीए राहुल राजळे
यांच्यावर,
गोळीबार केल्याची घटना घडली आहे .राजळे हे सोनई येथील काम अटोपून घोडेगावमार्गे आपल्या घरी मोटारसायकलवरुन निघाले होते. राजळे लोहगाव येथील आपल्या राहत्या घराजवळ येताच पांढऱ्या रंगाच्या चारचाकी गाडीतून आलेल्या आरोपींनी राहुल राजळे यांच्यावर गोळीबार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.गोळीबारात राजळे यांच्या कमरेखाली एक व डाव्या पायाला एक गोळी लागली तर डाव्या हाताला एक गोळी चाटून गेली आहे. जखमीअवस्थेत स्वीय सहाय्यक राजळे यांना रात्रीच अहमदनगरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन मध्यरात्री त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.यासंदर्भात जखमी राहुल राजळे यांचे बंधू विकास जनार्धन राजळे (वय २७) यांच्या फिर्यादीवरून नितीन शिरसाठ (रा. वांजोळी,ता. नेवासा), बबलु लोंढे, संतोष भिंगारदिवे (दोघेही रा. घोडेगाव, ता. नेवासा), ऋषिकेश वसंत शेटे (रा. सोनई, ता. नेवासा) आणि इतर दोन ते तीन जणांविरोधात सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपींनी जुन्या वादातून हल्ला केला असल्याची माहिती समजली आहे. या घटनेमुळे नेवासा तालुक्यात हा चर्चेचा विषय बनला आहे .
