नेवासात ता. कत्तल करण्यासाठी चालविलेल्या गोवंश जनावरांचा टेम्पो पकडला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई.

नेवासा( खडका)
नेवासा तालुक्यातील खडका फाटा येथे जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने लावलेल्या सापळ्यात कत्तल करण्यासाठी चालविलेल्या पाच गोवंश जातीच्या जनावरांसह वाहतूक करणारा टेम्पो
असा सुमारे ३ लाख २२ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी नेवासा येथील नदीम सत्तार चौधरी (वय ३०, रा. खाटीक गल्ली) या
आरोपीवर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना दि. २१ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास खडका फाटा येथे घडली.
औरंगाबाद महामार्गावरील खडका फाटा झालेल्या कारवाईत पोना ज्ञानेश्वर शिंदे, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी फिर्यादीत म्हंटल,दि. २१ रोजी पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या आदेशानेपोसई गोर, पोहेकॉ दत्तात्रय गहाणे, पोना संदिप दरंदले, पोकॉ. आकाश काळे,पोकॉ. विनोद मासाळकर नेवासा पोस्टे हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना बातमीदारामार्फत बातमी मिळाली, सलाबतपूर ते खडका फाटा जाणारे रोडवर एक पांढरे रंगाचे टेम्पो क्र. एमएच मधून ०४
जीएफ. ७७०४ गोवंश जनावरांना अमानुषपणे वागणूक देऊन त्यांना बिनाचारा व पाण्याचे ताब्यात ठेवून त्यांची कत्तली करण्याकरीता वाहतूक करत असल्याची खबर मिळाली. त्याठिकाणी सापळा लावला.खडका फाटा चौकात टेम्पो क्र. एमएच ०४ जीएफ. ७७०४ आल्याने चालकास ताब्यात घेतले. त्याचे नाव नदीम सत्तार चौधरी रा. खाटीक गल्ली नेवासा ) त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पशुसंवर्धन (सुधारणा) अधिनियम सन १९९५
चे कलम ५ (अ) मो. वा. का. क. १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.