नेवासा-: प्रतिनिधी-:नेवासा तालुक्यातील मक्तापूर गावातील होतकरू व कष्टाळू युवक आदित्य किशोर महानोर याची भारतीय सैन्यामद्धे निवड झाली,यामुळे मक्तापुर,व नेवासा फाटा याठिकाणी ग्रामस्थाच्या वतीने या युवकाचे जंगी सत्कार करण्यात आला,यावेळी नेवासा फाटा येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर,छत्रपती शिवाजी महाराज चौक व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करण्यात आली यावेळी मराठा सुकाणू समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे यांनी या युवकाचा सत्कार केला व त्याची जम्मू काश्मीर याठिकाणी प्रशिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल शुभेछ्या देऊन त्यास भारत देशाची व आपल्या मायभूमीची सेवा करण्यासाठी शुभेछ्या दिल्या.यावेळी सदर सत्काराच्या कार्यक्रमास युवा नेते हेमंत शेठ महानोर,ग्रामपंचायत सदस्य अरुण महानोर,समर्थ गायकवाड मंगेश महानोर,गजू महानोर,बजरंग महानोर,बबनभाऊ महानोर यावेळी नेवासा तालुक्याचे आमदार श्री.विठ्ठलराव लंघे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी पंचक्रोशीतील मक्तापूर,खडका व नेवासा फाटा परिसरातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते