👑 'त्रिशक्ती'चे लोणीत शाही स्वागत! 🤝

👑 'त्रिशक्ती'चे लोणीत शाही स्वागत! 🤝
केंद्रीय गृहमंत्री शहांच्या दौऱ्यानिमित्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी नेवासा, संगमनेर, शेवगावचे आमदार उपस्थित
शिर्डी/लोणी)
शिर्डी: केंद्रीय गृहमंत्री अमित जी शहा साहेब यांच्या शिर्डीतील नियोजित भव्य कार्यक्रमासाठी राज्याचे प्रमुख नेते दाखल होताच, लोणी-प्रवरानगर येथील हेलिपॅडवर भाजप आणि महायुतीच्या नेत्यांनी अभूतपूर्व गर्दी केली होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब या 'त्रिशक्ती' नेतृत्वाचे आगमन होताच, जिल्ह्यातील प्रमुख आमदारांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले.
आमदार लंघे-खताळ-राजळे यांची विशेष उपस्थिती
अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख विधानसभा मतदारसंघांचे प्रतिनिधीत्व करत अनेक महत्त्वाचे आमदार यावेळी उपस्थित होते. यामध्ये नेवासा तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, संगमनेरचे जॉईंट किलर आमदार अमोल जी खताळ आणि शेवगाव-पाथर्डीच्या कार्यसम्राट आमदार सन्माननीय मोनिकाताई राजळे यांचा सहभाग विशेष लक्षणीय होता. या आमदारांनी प्रमुख नेत्यांना पुष्पगुच्छ देऊन शिर्डी दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या.
पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मांदियाळी
या स्वागतासाठी भारतीय जनता पार्टी (BJP) आणि महायुतीचे स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यामुळे लोणी परिसर कार्यकर्त्यांनी फुलून गेला होता. उपस्थित मान्यवरांमध्ये:
 * आरोग्य सेलचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख डॉ. बाळासाहेब कोलते
 * धर्मरक्षक गणेश चौगुले सर
 * जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आदिनाथ पटारे
 * झापवाडीचे सरपंच पांडुरंग वाघ
 * नानासाहेब डौले पाटील
 * युवा नेते अर्जुन कर्डीले
 * यांसह नेवासा भाजपचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय गृहमंत्र्यांच्या या दौऱ्यामुळे शिर्डीसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. LOCAL SHIRDI

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.