जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी स्वीकारला शनी देवस्थानचा पदभार 🚩

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी स्वीकारला शनी देवस्थानचा पदभार 🚩

प्रशासकीय कार्यालय पुढील आदेशापर्यंत सील
..
अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळातील गैरव्यवहार व भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर सरकारने निर्णायक पाऊल उचलले आहे. नुकतेच राज्य सरकारने विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचा आदेश काढला. त्यानंतर आज जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी शनिदेवाचे अभिषेक करून अधिकृतरित्या प्रशासकीय ताबा स्वीकारला.

या वेळी त्यांनी देवस्थानचे कार्यालय भेट देऊन चौकशी केली असता अनेक अनियमितता व कागदपत्रांमध्ये फेरफार आढळून आले. काही दिवसांपासून जुन्या तारखांवर नवीन आदेश नोंदी केल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळेच जिल्हाधिकारी आशिया यांनी तातडीचा निर्णय घेत सर्व प्रशासकीय कार्यालय सील केले असून, कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले. 👮

डॉ. आशिया यांनी स्पष्ट केले की –

> “भ्रष्टाचारात सामील असलेल्या प्रत्येकावर कठोरातील कठोर कारवाई केली जाईल. भाविकांना सुविधा मिळाव्यात व कारभार पारदर्शक व्हावा यासाठी ठोस पावले उचलली जातील.”



या पदभार स्विकार समारंभावेळी बरखास्त विश्वस्त मंडळातील कुठलाही अधिकारी उपस्थित नव्हता. मात्र, मोठ्या संख्येने स्थानिक नेते व पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये आमदार विठ्ठलराव लंघे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे, अंकुश काळे, सचिन देसरडा, डॉ. वैभव शेटे, अशोक टेकने, डॉ. उदयकुमार बल्लाळ, नेवासा मंडलाध्यक्ष मनोज पारखे, एस.बी. शेटे, शिवसेनेचे बाळासाहेब पवार, भाऊसाहेब वाघ, बंडू शिंदे, भारत बेलेकर, भाजप जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आदिनाथ पटारे, किरण जाधव यांच्यासह तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.