**पाचेगाव येथे सोयाबीन शेती दिन उत्साहात साजरा**

**पाचेगाव येथे सोयाबीन शेती दिन उत्साहात साजरा**
श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था, कृषि विज्ञान केंद्र , दहिगाव ने मा. अध्यक्ष आ. डॉ. नरेंद्रजी घुले पाटील , उपाध्यक्ष मा.आ. चंद्रशेखर घुले पाटील, तज्ञ संचालक डॉ. क्षितीज घुले पाटील आणि सर्व विश्वस्त मंडळ श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था, भेंडे यांचे मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत , कृषि विज्ञान केंद्र दहिगाव ने यांचे मार्फत सोयाबीन समूह आद्यरेषा पिक प्रात्यक्षिकाचे आयोजन पाचेगाव ता. नेवासा जि. अहिल्यानगर येथे खरीप हंगाम २०२५ मध्ये करण्यात आलेले आहे. यामध्ये फुले किमया या वाणाचे प्रात्यक्षिक सदर गावात ५० प्रगतशील महिला आणि पुरुष शेतकऱ्यांच्या शेतावर घेण्यात आले आहे. सोयाबीन पिकातील आधुनिक तंत्रज्ञान तळागळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे दृष्टीने हे प्रात्यक्षिक घेतले असून जास्तीत जास्त उत्पादन देणारे वाण सोबतच रुंद सरी वरंबा तंत्रज्ञान , माती परीक्षणानुसार योग्य अन्न द्रव्यांचा वापर, एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन तसेच काढणी पश्च्यात तंत्रज्ञान या प्रात्यक्षिकातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचा कृषि विज्ञान केंद्राचा प्रामाणिक प्रयत्न आहे. 
याचाच एक भाग म्हणून आज येथे “सोयाबीन एकात्मिक व्यवस्थापन तंत्रज्ञान” या विषयावर शेती दिनाचे आयोजन करण्यात आले. शेती दिनानिमित्त शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकात वापरलेल्या तंत्रज्ञानाची माहिती  प्रगतशील शेतकरी दिलीप कुलकर्णी, राहुल तुवर यांनी दिली. सदर प्रात्यक्षिकात त्यांनी जिवाणू खताची बिजप्रक्रीया, सल्फर चा वापर, पिवळे आणि निळे चिकट सापळे, कामगंध सापळे, एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा वापर केल्याचे त्यांनी सांगितले.
कृषि विद्या विभागाचे विषय विशेषज्ञ  श्री. नारायण निबे यांनी शेती दिनाचे महत्व आणि शेती दिन का घ्यायचा तसेच एकात्मिक पद्धतीने सोयाबीन पिकाचे व्यवस्थापन कसे करावे या विषयी उपस्थित शेतकरी मार्गदर्शन केले यांना मार्गदर्शन केले. कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख, डॉ. एस.एस. कौशिक यांनी सोयाबीन पिकात सध्य परिस्थितीत करावयाच्या उपाय योजना, बियाणासाठी सोयाबीन साठवण तंत्रज्ञान या विषयी माहिती दिली.
यावेळी अशोक सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. बाळासाहेब शिंदे, सरपंच वामनराव तुवर, विकास सोसायटी चे संचालक भागीरथ पवार, श्री. नामदेव नांदे, प्रगतशील शेतकरी मोहन तुवर, दिलीप विठ्ठल कुलकर्णी, अशोक तुवर हे उपस्थित होते. श्री. यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नारायण निबे तर श्री. प्रकाश बहिरट यांनी आभार मानले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.