निपाणी निमगावमध्ये उद्या मांगिरबाबा यात्रोत्सव; भक्तिमय वातावरणात होणार विविध धार्मिक कार्यक्रम


निपाणी निमगावमध्ये उद्या मांगिरबाबा यात्रोत्सव; भक्तिमय वातावरणात होणार विविध धार्मिक कार्यक्रम

निपाणी निमगाव (प्रतिनिधी):
निपाणी निमगाव (कणगरे वस्ती) येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने मांगिरबाबा यात्रा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार, दिनांक २२ जुलै २०२५ रोजी हा पवित्र सोहळा पार पडणार असून, सध्या संपूर्ण गावात यात्रेच्या तयारीला जोरदार सुरुवात झाली आहे.

कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे:

🔸 सकाळी ८.०० वाजता – कावड मिरवणूक
🔸 सकाळी १०.०० ते दुपारी १.०० – भव्य देव मिरवणूक
🔸 दुपारी २.०० वाजल्यापासून – महाप्रसाद वितरण (सर्व भाविकांसाठी)
🔸 रात्री ९.०० ते पहाटे २.०० – भजन व गाण्याचा भक्तिरसात न्हालेला कार्यक्रम

सदर यात्रोत्सवात परिसरातील हजारो भाविक सहभागी होणार असून, दिवसभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

आयोजक मंडळ

या यात्रेच्या आयोजनासाठी माऊली कनगरे यांच्यासह मांगिरबाबा यात्रा उत्सव कमेटी कार्यरत आहे. यामध्ये खालील मान्यवरांचा समावेश आहे:

कार्यवाह मंडळ:

बाळासाहेब कनगरे – अध्यक्ष

निलेश कनगरे – सचिव

रावसाहेब कनगरे – कार्याध्यक्ष

ऋषिकेश कनगरे, गणेश कनगरे – संस्थापक

दीपक कनगरे, कमलेश कनगरे, प्रेम ससाणे, विजय कनगरे, मनेश कनगरे, लक्ष्मण मोहिते, पंकज घोरपडे – सदस्य

योगेश खंडागळे, प्रकाश कनगरे, किरण कनगरे, संदिप कनगरे, विकास ससाणे – सल्लागार

रोहन कनगरे, सागर कनगरे, राहुल कनगरे, अनिल सरोदे, ऋतिक घोडके, बाळासाहेब ग. कनगरे – सहसदस्य


स्थळ:

मांगिरबाबा देवस्थान,
कणगरे वस्ती,
निपाणी निमगाव.

या यात्रा उत्सवासाठी सर्व ग्रामस्थ, महिला मंडळ, युवक मंडळ, तसेच भाविकांनी एकत्र येत मोठ्या उत्साहात तयारी केली आहे. यात्रेच्या यशस्वीतेसाठी सर्व गावकऱ्यांचे मोलाचे योगदान असून, ग्रामस्थांनी सर्व भाविकांना यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.


---

।। वरखेडआई प्रसन्न ।।
।। मांगिरबाबा प्रसन्न ।।


---


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.